AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Apple seeds : आरोग्य वर्धक सफरचंदाच्या पोटात दडलय विष.. ?सफरचंदाच्या इतक्या बिया खाल्यावर होऊ शकतो मृत्यू!

सफरचंद बिया मानवासाठी हानिकारक आहेत. पण, केव्हा..तर, त्यांचे चुकून जास्त प्रमाणात सेवन झाल्यास ते नुकसान दायक ठरतात. सफरचंदाच्या बियांमध्ये अमिग्डालिन नावाचे संयुग असते जे विषारी असते. जर ते एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जास्त प्रमाणात गेले तर त्याचा मृत्यू होऊ शकतो.

Apple seeds : आरोग्य वर्धक सफरचंदाच्या पोटात दडलय विष.. ?सफरचंदाच्या इतक्या बिया खाल्यावर होऊ शकतो मृत्यू!
सफरचंद
| Updated on: Sep 08, 2022 | 5:34 PM
Share

मुंबई : आपण सर्वजण लहानपणापासून ऐकत आलो आहोत ‘An Apple a Day, Keeps Doctor Away’ म्हणजे जर आपण रोज एक सफरचंद खाल्लं तर आपण डॉक्टरांपासून दूर राहू शकतो कारण शरीरासाठी सर्वात फायदेशीर (most beneficial) फळांच्या यादीत सफरचंदाचा अव्वल नंबर येतो. त्यामध्ये जीवनसत्त्वे, फायबर (Vitamins, fiber) आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. हे आपल्या शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. सफरचंद खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदा होत असला तरी, सफरचंदाच्या पोटात दडलेल्या बिया प्रचंड हानी पोहोचवू शकतात. बहुतेक लोक बिया काढून टाकल्यानंतरच सफरचंद खातात, पण कधी कधी चुकून एक-दोन बिया तोंडात गेल्या तर त्याही खाल्ल्या जातात. त्याचबरोबर सफरचंदाचा रस प्यायल्यानंतर त्याचेबरोबर सर्व बिया पोटात जातात. परंतु, असे करणे तुमच्या आरोग्यासाठी हाणीकारक (Harmful) होऊ शकते. जाणून घ्या, सफरचंदाच्या बियांवर केलेल्या वैज्ञानिक संशोधनाबद्दल सविस्तर माहिती.

सफरचंदाच्या बिया विषारी आहेत का?

सफरचंदाच्या बिया मानवासाठी हानिकारक असतात यात शंका नाही. पण, जेव्हा एखादी व्यक्ती जास्त प्रमाणात सेवन करते तेव्हा त्या शरीराचे नुकसान करतात. सफरचंदाच्या बियांमध्ये ‘अमिग्डालिन’ नावाचे संयुग असते जे विषारी असते. हे संयुग बियांच्या आत असते. बियांचे संरक्षण करण्यासाठी, त्यावर एक थर लावला जातो जो खूप कठीण असतो. जेव्हा बिया गिळल्या जातात तेव्हा पोटातील रसायने त्याचा थर तोडण्यास सक्षम नसतात. त्यामुळे विषारी संयुग बाहेर पडत नाही, परंतु, बिया चघळल्या किंवा खाल्ल्या गेल्यास ‘अमिग्डालिन’चे हायड्रोजन सायनाइडमध्ये रूपांतर होते. हे खूप हानिकारक आहे आणि जर ते जास्त प्रमाणात सेवन केले गेले तर यामुळे व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.

विष मुक्त सफरचंद कसे ओळखावे

रोजेसिए प्रजातींच्या फळांच्या बियांमध्ये ‘अमिग्डालिन’ सामान्यत: जास्त प्रमाणात आढळते. या प्रजातींच्या फळांमध्ये सफरचंद, बदाम, जर्दाळू, पीच आणि चेरी यांचा समावेश होतो. सायनाइडचा वापर विष म्हणून केला जातो. त्यामुळे शरीरातील पेशींमध्ये ऑक्सिजन जाणे थांबते आणि काही मिनिटांतच व्यक्तीचा मृत्यू होतो. सायनाइडच्या थोड्या प्रमाणात डोकेदुखी, चक्कर, अस्वस्थता आणि तणाव यासह शरीराला अल्पकालीन सौम्य नुकसान होऊ शकते. शरीरात सायनाईडचे प्रमाण जास्त झाल्यास त्या व्यक्तीला उच्च रक्तदाब, अर्धांगवायू, मूर्च्छा येण्याची शक्यता असते. गंभीर प्रकरणांमध्ये, एखादी व्यक्ती कोमात जाऊ शकते आणि त्याचा मृत्यूही होऊ शकते.

संशोधन काय म्हणते

2015 च्या संशोधनानुसार, सफरचंदाच्या बियांच्या एका ग्रॅममध्ये ‘अमिग्डालिन’चे प्रमाण सफरचंदाच्या वेगवेगळ्या जाती आणि प्रतवारी नुसार एक ते चार मिलिग्रॅम दरम्यान असते. तथापि, बियाण्यांमधून सायनाइड सोडण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. सुमारे 50-300 मिलिग्रॅम हायड्रोजन सायनाइडची मात्रा घातक ठरू शकते. सफरचंदाच्या एका बियामध्ये 0.6 मिलिग्रॅम हायड्रोजन सायनाइड असते. म्हणजे 80 ते 500 बिया खाल्ल्याने माणसाचा जीव जाऊ शकतो. जर तुम्ही संपूर्ण सफरचंद बियांसह खाल्ले तर ते तुमचे कोणतेही नुकसान करणार नाही. संशोधनात, शास्त्रज्ञांनी सल्ला दिला आहे की, ‘अमिग्डालिन’टाळण्यासाठी, सफरचंद खाण्यापूर्वी आणि सफरचंदाचा रस पिण्यापूर्वी त्यांच्या बिया काढून टाकणेच अधिक चांगले आहे.

सफरचंद रस आणि स्मूदी कसे प्यावे

संशोधनादरम्यान, सफरचंदाच्या ज्यूसमध्ये ‘अमिग्डालिन’चे प्रमाण 0.001 ते 0.007 प्रति मिलिलिटर प्रति मिलिलिटर असल्याचे आढळून आले, जे खूपच कमी आहे. शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की कॅन केलेला ज्यूसमध्ये असलेल्या अॅमिग्डालिनमुळे कोणतेही नुकसान होत नाही. मात्र, सफरचंद खाण्यापूर्वी किंवा घरी त्याचा रस काढण्यापूर्वी बिया काढून टाकल्या पाहिजेत, असा आग्रहही येथील शास्त्रज्ञांनी दिला. सफरचंद आणि त्याची साल आरोग्यासाठी खूप चांगली आहे आणि त्यांना कोणताही धोका नाही. एका सफरचंदात आठ किंवा 10 बिया देखील असतात, ज्यामुळे आरोग्याला फारशी हानी होत नाही, परंतु फक्त हे लक्षात ठेवा की कोणत्याही व्यक्तीने सफरचंदाच्या 80 पेक्षा जास्त बिया खाऊ नयेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.