AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Healthy Drinks | शरीराला थंड आणि निरोगी ठेवायचंय? मग, ‘या’ पेयांचे सेवन ठरेल फायदेशीर!

शरीराला आतून थंड आणि निरोगी ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. या हंगामात, बरेच लोक स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी अनेक पेयांचे सेवन करतात. यात सरबत, शेक आणि स्मूदी या सारख्या अनेक पेयांचा समावेश आहे. ही पेये प्यायल्यानंतर तुम्हाला एकदम रीफ्रेश वाटेल.

Healthy Drinks | शरीराला थंड आणि निरोगी ठेवायचंय? मग, ‘या’ पेयांचे सेवन ठरेल फायदेशीर!
हेल्दी ड्रिंक्स
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Jun 16, 2021 | 2:51 PM
Share

मुंबई : शरीराला आतून थंड आणि निरोगी ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. या हंगामात, बरेच लोक स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी अनेक पेयांचे सेवन करतात. यात सरबत, शेक आणि स्मूदी या सारख्या अनेक पेयांचा समावेश आहे. ही पेये प्यायल्यानंतर तुम्हाला एकदम रीफ्रेश वाटेल. या काळात फळांव्यतिरिक्त आपण इतर अनेक देसी पेय ट्राय करू शकता. या पेयांबद्दल खास गोष्ट अशी आहे की, ती फार लवकर तयार करता येतात. चला तर, जाणून घेऊया अशी कोणती पेय आहेत…(Healthy drinks to stay cool and healthy during hot weather)

देसी जलजीरा

देसी जलजीरा हे उत्तर भारतातील लोकप्रिय पेय आहे. जिरेपूड, चिंच किंवा आमचूर (कच्चा आंबा) पावडर, मिरपूड, काळे मीठ, बडीशेप आणि थंड पाण्याने आपण हे पेय बनवू शकता. यात तुम्ही पुदीन्याची पाने आणि थोडी बुंदी देखील घालू शकता. या सर्व गोष्टी आपल्या घरातील मसाल्याच्या डब्यामध्ये सहज उपलब्ध असतात. आपण हे मसालेदार आणि चटपटीत पेय घरच्या घरी बनवू शकता.

लिंबू पाणी किंवा शिकंजी

भारतात लिंबू वर्षभर उपलब्ध असतो. लिंबू हा व्हिटामिन सीचा चांगला स्रोत आहे. लिंबू उन्हाळ्यात एक थंडावा आणि समाधान देणारा, तसेच तृष्णा शांत करणारा घटक ठरतो. यासाठी, थंड पाण्यात लिंबू पिळून त्याचा रस तयार करावा. आपण इच्छित असल्यास त्यात पुदीन्याची पाने टाकू शकता. तसेच, त्यात चवीनुसार मीठ आणि साखर घाला. काही लोक साखर घालत नाहीत. हा हायड्रेशनचा एक चांगला स्रोत आहे.

लस्सी

दह्यापासून बनवलेल्या लस्सीला बर्‍याच नावांनी ओळखले जाते. पंजाब आणि उत्तर भारतात ही लस्सी आहे, तर गुजरातमध्ये ‘मठ्ठा’ म्हणून ओळखले जाते. हे पेय तयार करण्यासाठी दही, पाणी आणि साखर याची गरज असते. काही लोक साखरेऐवजी मीठ वापरतात. आपण गोड लस्सीत आणखी बरेच स्वाद मिसळू शकता – जसे आंबा लस्सी, ड्राई फ्रूट्स लस्सी, स्ट्रॉबेरी लस्सी आणि मलाई लस्सी…

सत्तू

सत्तू हे बिहारचे एक लोकप्रिय कोल्ड ड्रिंक आहे. हे भाजलेली हरभरा पावडर आणि गहू पावडरपासून बनवले जाते. हे आपल्या पोटासाठी अत्यंत पौष्टिक आणि निरोगी पेय आहे. सत्तू पेय तयार करण्यासाठी, 1.5 लिटर थंड पाणी घ्या, 6 चमचे सत्तू (भाजलेले हरभरा पीठ) आणि 4 ते 6 चमचे साखर किंवा गूळ घाला. चवीनुसार थोडे मीठ घाला. अशा प्रकारे सत्तू पेय तयार होईल.

(Healthy drinks to stay cool and healthy during hot weather)

हेही वाचा :

Protein Deficiency Symptoms : प्रोटीनची शरीरात कमतरता असल्याची ‘ही’ आहेत प्रमुख लक्षणे !

काळे तीळ आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली