Protein Deficiency Symptoms : प्रोटीनची शरीरात कमतरता असल्याची ‘ही’ आहेत प्रमुख लक्षणे !

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 16, 2021 | 7:37 AM

प्रोटीन आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहे. आपल्या शरीरात पुरेसे प्रोटीन नसल्यास आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपल्या शरीराला प्रोटीन धान्य, नट्स, कडधान्य आणि सोयासारख्या पदार्थांमधून मिळते.

Protein Deficiency Symptoms : प्रोटीनची शरीरात कमतरता असल्याची 'ही' आहेत प्रमुख लक्षणे !
प्रोटीन
Follow us

मुंबई : प्रोटीन आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहे. आपल्या शरीरात पुरेसे प्रोटीन नसल्यास आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपल्या शरीराला प्रोटीन धान्य, नट्स, कडधान्य आणि सोयासारख्या पदार्थांमधून मिळते. आपण जर कडधान्य आणि नट्स आहारात घेणे टाळले तर आपल्या शरीरात प्रोटीनची कमतरता निर्माण होते.  शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर आपल्याला हे लक्षणे दिसू शकतात. (These are the main symptoms of protein deficiency in the body)

सतत भूक लागणे

वाहनांप्रमाणेच, शरीराला कार्य करण्यासाठी इंधन देखील आवश्यक असते. प्रोटीन हे शरीरासाठी सर्वात महत्वाचे इंधन आहे. परंतु जर आपल्या शरीरात प्रोटीनची कमतरता झाली असेल तर आपल्याला भूक जास्त प्रमाणात लागते आणि जंक फूड खाण्याची जास्त इच्छा होते. यामुळे वजन वाढणे, लठ्ठपणा आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.

कमकुवत केस आणि नखे

आपले केस आणि नखे निरोगी ठेवण्यासाठी प्रोटीन आवश्यक आहे, म्हणून जर आपल्या शरीराला पुरेसा प्रोटीन मिळत नसेल तर आपले केस आणि नखे देखील कमकुवत दिसू लागतील. शरीरात प्रोटीन कमी झाले की, नखे आणि केस सारखेच तुटतात.

काळे चणे

काळे चणेदेखील प्रोटीन्सचा उत्तम नैसर्गिक स्त्रोत आहे. काळ्या चाण्यांना ‘बंगाल ग्राम’ म्हणून सुद्धा ओळखले जाते. 100 ग्रॅम चाण्यांमध्ये 19 ग्रॅम प्रोटीन असते. शिवाय हा घटक आपल्या नेहमीच्या जेवणात देखील समाविष्ट असतो.

सुरकुत्याची समस्या

आपल्या त्वचेला निरोगी राहण्यासाठी प्रोटीन आवश्यक असतात. जर आपल्या त्वचेला पुरेसे प्रोटीन न मिळाल्यास आपली त्वचा मऊ होऊन त्यावर सुरकुत्या येण्यास सुरूवात होते. यामुळे वयाआधीच आपण वृद्ध दिसतो. यामुळे आपल्या त्वचेसाठी प्रोटीन आवश्यक असतात.

शेंगदाणे

शेंगदाणा हा प्रोटीनचा उत्तम नैसर्गिक स्रोत आहेत. विशेष म्हणजे शेंगदाणे बाजारात सहज उपलब्ध असतात. 100 ग्रॅम शेंगदाणे शरीराला 26 ग्रॅम प्रोटीन देऊ शकतात. 1 किलो शेंगदाण्याची किंमत 80 ते 100 रुपये असल्याने, दिवसाला केवळ 10 रुपयांत तुम्हाला नैसर्गिक प्रोटीन मिळू शकते.

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

HEALTH | ‘कोरोना’च्या धसक्याने जीवनशैलीत चांगले बदल, पावसाळी आजारांत 50% घट!

(These are the main symptoms of protein deficiency in the body)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI