Weight Loss : 4 वेलचीचे दाणे पाण्यात मिक्स करून प्या आणि लठ्ठपणा कमी करा, जाणून घ्या कसे!
इवलीशी दिसणारी वेलची आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. वेलची एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची असेही म्हटंले जाते. तुम्हाला माहित आहे का की गरम पाण्यात वेलची मिक्स करून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. होय, वजन कमी करण्यासाठी वेलची अत्यंत फायदेशीर आहे.

मुंबई : इवलीशी दिसणारी वेलची आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. वेलची एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची असेही म्हटंले जाते. तुम्हाला माहित आहे का की गरम पाण्यात वेलची मिक्स करून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. होय, वजन कमी करण्यासाठी वेलची अत्यंत फायदेशीर आहे. विशेषता: पोटाची चरबी कमी करण्यासाठी वेलची फायदेशीर आहे. (Include cardamom water in the diet and lose weight)
वेलचीमध्ये भरपूर प्रमाणात मेलाटोनिन असते. जे चयापचय दर वाढवण्यास मदत करते. हे पचन सुधारून चरबी बर्न मदत करते. ज्यामुळे ते जलद वजन कमी करण्यास मदत करते. पूर्वीच्या काळात, वेलची खाल्ल्यानंतर माऊथ फ्रेशनर म्हणून वापरली जात असे.
वेलचीचे दाणे चावल्यानंतर बाहेर पडलेला रस पचनक्रिया सुधारून पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतो. जर तुम्हाला वेगाने वजन कमी करायचे असेल तर 4 ते 5 वेलची एका ग्लास कोमट पाण्यात प्या. काही दिवसांमध्ये तुमचे वजन कमी होईल.
तज्ञांचे मत
तज्ञांच्या मते, पेयांमध्ये मसाले घालून पिल्यामुळे पचन आणि चयापचय दर चांगला होतो. पेयांमध्ये किंवा सूपमध्ये बडीशेप, वेलची, दालचिनी मिसळून पिल्यामुळे आपले वजन झपाट्याने कमी होण्यास मदत मिळते. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, लठ्ठपणाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे कोरोनाच्या काळात जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट वस्तूंचा वापर आणि गतिहीन जीवनशैली. या गोष्टींमुळे हार्मोनल बदल होतात, ज्याचा परिणाम चयापचयवर होतो. यामुळे शरीरात चरबी जमा होऊ लागते आणि वजन वाढते.
वजन कमी करण्यासाठी कसे वापरावे
वेलचीचे पेय बनवण्यासाठी एका पातेल्यात 2 कप पाणी टाका आणि उकळू द्या आणि नंतर वेलचीच्या 4 ते 5 बिया घाला. यानंतर, पाणी गाळून घ्या आणि झोपण्यापूर्वी प्या. चांगल्या झोपेसाठी तुम्ही त्यात दूध घालू शकता आणि चयापचय वाढवू शकता.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Include cardamom water in the diet and lose weight)
