खोकला, घश्यातील खवखव दूर करेल लसूण, जाणून घ्या याचे लाभदायी फायदे

आपल्याला खोकला असेल तर तो बरा करण्यासाठी लसूण प्रभावी ठरू शकते. लसूण खाल्ल्याने प्रतिकारशक्तीही वाढते. याशिवाय ही बर्‍याच आजारांवरही गुणकारी आहे. (Garlic will relieve cough, sore throat, know its health benefits)

खोकला, घश्यातील खवखव दूर करेल लसूण, जाणून घ्या याचे लाभदायी फायदे
खोकला, घश्यातील खवखव दूर करेल लसूण, जाणून घ्या याचे लाभदायी फायदे

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता धोका पाहता स्वत: ला आणि कुटुंबास सुरक्षित ठेवणे खूप महत्वाचे आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोक अनेक घरगुती उपचारांचा अवलंब करीत आहेत. तज्ज्ञ आणि डॉक्टर देखील कोरोनाचा बचाव करण्यासाठी अशा अनेक घरगुती गोष्टी घेण्याचा सल्ला देतात. यापैकीच एक आहे लसूण. लसूण अनेक प्रकारच्या समस्या दूर करते. जर आपल्याला खोकला असेल तर तो बरा करण्यासाठी लसूण प्रभावी ठरू शकते. लसूण खाल्ल्याने प्रतिकारशक्तीही वाढते. याशिवाय ही बर्‍याच आजारांवरही गुणकारी आहे. (Garlic will relieve cough, sore throat, know its health benefits)

खोकला बरा करते

जर आपल्याला खोकला असेल तर आपण लसूण वापरू शकता. यामुळे खोकल्यापासून आराम मिळेल. आपण लसणाच्या रसाचे काही थेंब एक ग्लास डाळिंबाच्या रसात घाला. हे चांगले मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतील.

घशाची खवखव बरी होईल

कोरोना काळात अनेकांना घशात खवखव होत असते. जर आपल्यालाही ही समस्या असेल तर एक ग्लास गरम पाण्यात लसणाच्या रसाचे काही थेंब मिसळा. या पाण्याने गुळण्या करा, तुम्हाला आराम मिळेल.

दम्यामध्ये फायदेशीर

जर आपल्याला दमा असेल तर आपण लसूणचा रस वापरावा. यामुळे तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. याशिवाय तुम्ही लसूणही खाऊ शकता. दम्याच्या रूग्णांनी एक ग्लास पाण्यात लसूणचा रस मिसळून प्यायल्याने आराम मिळतो.

मुरुमांचा त्रास कमी होतो

जर मुरुमांचा त्रास असेल तर लसूणचा रस वापरा. यासाठी 5 ते 6 चमचे लसूणचा रस घ्या आणि कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा. थोडावेळ सुकू द्या. आता थंड पाण्याने चेहरा धुवा. तुम्हाला आराम मिळेल.

कोलेस्टेरॉल सुधारते

लसूण सेवन केल्याने तुमच्या वाढत्या कोलेस्टेरॉलची पातळी सुधारते. आपण लसूणचा रस वापरू शकता. यामुळे हृदयाच्या समस्येवरही मात करता येते. तथापि, लसणीचा रस जास्त काळ ठेवू नये याची काळजी घ्या.

केसांची समस्या

जर आपले केस गळत असतील आणि आपल्याला केसात कोंड्याची समस्या असेल तर आपण लसूण रस वापरू शकता. 2 चमचे लसूण रस घ्या, त्यात मोहरीच्या तेलाचे काही थेंब घाला आणि आपल्या केसांच्या मुळांवर लावा. हे केस गळणे आणि डोक्यातील कोंडापासून मुक्ती देईल. (Garlic will relieve cough, sore throat, know its health benefits)

इतर बातम्या

8GB/128GB, 64 MP रियर, 44MP सेल्फी कॅमेरा, Vivo चा 5G फोन बाजारात

जेव्हा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त बहुरुपी होऊन पोलीस ठाण्यांचीच झडती घेतात

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI