8GB/128GB, 64 MP रियर, 44MP सेल्फी कॅमेरा, Vivo चा 5G फोन बाजारात

या स्मार्टफोनमध्ये दोन स्टोरेज ऑप्शन्स देण्यात आले आहेत. यापैकी 8GB + 128GB वेरिएंटची किंमत 29,990 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे

8GB/128GB, 64 MP रियर, 44MP सेल्फी कॅमेरा, Vivo चा 5G फोन बाजारात
Vivo V21 5G

मुंबई : Vivo कंपनीने गेल्या आठवड्यात भारतात Vivo V21 5G स्मार्टफोन लॉन्च केला होता. या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशनबाबतची माहिती जाहीर करण्यात आली आहे. कंपनीने 800U SoC सह आपला लेटेस्ट मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. हा फोन आजपासून फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. (Vivo V21 5G with 8 GB RAM, 64 MP rear andd 44 MP selfie camera, sale live on Flipkart from today)

हा 5 जी स्मार्टफोन विवोचं सर्वात पातळ डिव्हाइस आहे ज्याची जाडी 7.29 मिमी इतकी आहे. हे डिव्हाइस 90 हर्ट्झच्या एमोलेड डिस्प्लेसह येतं. हे डिव्हाइस सर्वात आधी (27 एप्रिल रोजी) मलेशियात लाँच करण्यात आलं होते. त्यानंतर, 29 एप्रिल रोजी Vivo V21 5G हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला. हा स्मार्टफोन 6.44-इंचाचा ई 3 एमोलेड डिस्प्लेसह डिय्रूडॉप नॉच, 800 निट्स पीक ब्राइटनेस आणि एचडीआर 10 प्लस सपोर्टसह सादर करण्यात आला आहे.