AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : निरोगी राहण्यासाठी आहारात ‘या’ 4 पदार्थांचा समावेश करा!

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून जवळपास सर्वचजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. यामुळे आपल्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. ज्यामध्ये स्क्रीन वेळ आणि जास्त वेळ काम करण्याची वेळ वाढली आहे. यामुळे प्रत्येकाच्या खाण्याच्या सवयीही बदलल्या आहेत. या काळात अस्वास्थ्यकर पदार्थ खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे.

Health Tips : निरोगी राहण्यासाठी आहारात 'या' 4 पदार्थांचा समावेश करा!
आहार
| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 10:52 AM
Share

मुंबई : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून जवळपास सर्वचजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. यामुळे आपल्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. ज्यामध्ये स्क्रीन वेळ आणि जास्त वेळ काम करण्याची वेळ वाढली आहे. यामुळे प्रत्येकाच्या खाण्याच्या सवयीही बदलल्या आहेत. या काळात अस्वास्थ्यकर पदार्थ खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. पौष्टिक अन्न निरोगी राहण्यास महत्वाची भूमिका बजावते. चला निरोगी राहण्यासाठी आपण कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता ते जाणून घेऊया.

बदाम

मजबूत रोगप्रतिकारक शक्तीसाठी पुरेसे प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजांसह पौष्टिक अन्न खाणे ही काळाची गरज आहे. बदाम हे व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, प्रथिने, रिबोफ्लेविन, जस्त इत्यादी पोषक घटकांचा समृद्ध स्रोत आहे. त्यात प्रथिने देखील असतात. जी स्नायूंच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. मधुमेहाने ग्रस्त लोक त्यांच्या आहारात बदामाचा समावेश करू शकतात. बदाम नाश्तामध्ये देखील आपण घेऊ शकतात. ते तुम्हाला दिवसभर सक्रिय ठेवण्यास मदत करतात.

संत्रा

आपल्या आहारात संत्र्याचा समावेश केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. ते एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट देखील आहे. जे पेशींचे नुकसान कमी करते. त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवते. संत्री व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्त्रोत आहे जे पांढऱ्या रक्त पेशी आणि प्रतिपिंडे तयार करते. आपली प्रतिकारशक्ती वाढवते आणि संक्रमण दूर ठेवते. संत्र्याचे थेट सेवन करण्याव्यतिरिक्त, तुम्ही संत्र्याचा रस तयार करू शकता.

काकडी

काकडीमध्ये सुमारे 96% पाण्याचे प्रमाण असते. हे शरीराला हायड्रेट करण्यास मदत करते. हे पचन सुधारते. काकडीमध्ये कॅलरीज कमी असतात आणि जेवणाच्या काही तास आधी रोज एक काकडी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के असतात. जे हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक आहेत. ते जीवनसत्त्वे ए, बी, सी, मॅंगनीज, तांबे आणि पोटॅशियमचे स्त्रोत आहेत, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतात. काकडीमध्ये जीवनसत्त्वे बी 1, बी 5 आणि बी 7 असतात जे चिंता आणि तणाव कमी करतात.

बीन्स

बीन्स प्रथिने, लोह आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात. ते फायबरमध्ये असल्यामुळे पचन नियंत्रित करते. त्यात विद्रव्य फायबर असते जे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकते. हे वजन कमी करण्यास मदत करते. आहारात अनेक प्रकारे बीन्सचा समावेश केला जाऊ शकतो. काळ्या आणि लाल बीन्सचा आहारामध्ये समावेश केला जाऊ शकतो.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include these 4 foods in your diet to stay healthy)

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ