Omega-3 Rich Foods : शाकाहारी लोकांसाठी ओमेगा -3 फॅटी अॅसिडचे 5 प्रमुख स्त्रोत, वाचा सविस्तर!  

आपल्या आहारात फळांपासून भाज्या आणि सीफूडपर्यंत निरोगी पोषक घटकांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. ओमेगा -3 समृद्ध अन्न हे त्यापैकी एक आहे. हे पोषक तत्व मेंदू, हृदय आणि प्रजनन प्रणालीसह शरीराच्या महत्त्वपूर्ण भागांसाठी फायदेशीर आहेत.

Omega-3 Rich Foods : शाकाहारी लोकांसाठी ओमेगा -3 फॅटी अॅसिडचे 5 प्रमुख स्त्रोत, वाचा सविस्तर!  
आरोग्य


मुंबई : आपल्या आहारात फळांपासून भाज्या आणि सीफूडपर्यंत निरोगी पोषक घटकांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. ओमेगा -3 समृद्ध अन्न हे त्यापैकी एक आहे. हे पोषक तत्व मेंदू, हृदय आणि प्रजनन प्रणालीसह शरीराच्या महत्त्वपूर्ण भागांसाठी फायदेशीर आहेत. नियमितपणे याचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

चिया बिया

सर्वात लोकप्रिय असलेल्या चिया बिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.  ते वजन कमी करणारे आणि हृदय निरोगी घटक म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे या चिया बियांमध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिडचे प्रमाणही चांगले असते.

अक्रोड

बरेच लोक मन आणि हृदयासाठी निरोगी अन्न म्हणून अक्रोडचा आहारात समावेश करतात. अक्रोडमध्ये देखील ओमेगा -3 फॅटी अॅसिड असते. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे अनेक प्रकारे सेवन केले जाऊ शकते. रात्री अक्रोड पाण्यात भिजून सकाळी खाणे अधिक फायदेशीर आहे.

सोयाबीन बीन्स

हे जपानमध्ये खूप लोकप्रिय आहे. सोयाबीन बीन्स देखील पोषणाचा एक चांगला स्रोत आहे. त्यामध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड चांगल्या प्रमाणात आहे. ओमेगा -3 फॅटी अॅसिड पोषक आहारासाठी शाकाहारी लोक त्याचा आहारात समावेश करू शकतात.

अंकुरलेले कडधान्य

अंकुरलेले कडधान्य दररोज खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. शिवाय आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते. अंकुरलेल्या कडधान्यामध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असते.

भोपळ्याच्या बिया

ओमेगा -3 सोबत, ओमेगा -6 फॅटी अॅसिड देखील भोपळ्याच्या बियांमध्ये आढळतात. हे हृदयाच्या आरोग्यासाठी तसेच मेंदूसाठी चांगले आहेत. कोलेस्टेरॉल कमी करते आणि शरीरात गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करते. भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे पचनासाठी चांगले मानले जातात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI