Tips to Increase Weight : वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहात? तर ‘या’ 6 पदार्थांचा आहारात समावेश करा!
ज्याप्रमाणे वजन कमी करणे अधिक लठ्ठपणा असलेल्या लोकांसाठी एक आव्हान असते. तसेच वजन वाढवणे हे पातळ लोकांसाठी मोठे आव्हानच असते.

मुंबई : ज्याप्रमाणे वजन कमी करणे अधिक लठ्ठपणा असलेल्या लोकांसाठी एक आव्हान असते. तसेच वजन वाढवणे हे पातळ लोकांसाठी मोठे आव्हानच असते. ज्या लोकांचे वजन प्रमाणापेक्षाही कमी आहे, अशा लोकांची चेष्टा केली जाते. अगदी कुपोषित असे लेबल देखील दिले जाते. जर आपणही कमी वजनामुळे त्रस्त असाल तर आपण काही टिप्स फाॅलो करून वजन वाढू शकता. (Include these foods in your diet and increase weight)
बटाटे : बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि जटिल साखर असते. बटाटे खाण्यास चवदार आणि वजनही वाढवतात. आपण आपल्या आहारात बटाट्यांचा समावेश केला पाहीजे. ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.
केळी आणि दूध : वजन वाढवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे दूध आणि केळी. केळीमध्ये भरपूर कॅलरी असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, परंतु वजन वाढण्यासही ते उपयोगी ठरते. आपण इच्छित असल्यास, दूध आणि केळी शेक देखील पिऊ शकता.
मनुका : रोज मूठभर मनुका खाल्ल्याने वजन वाढतं, तसेच शरीरातील रक्ताचा अभावही दूर होतो. जर आपण भिजवलेले मनुके खाल्ले तर ते आधिक फायदेशीर ठरेल.
खजूर आणि दूध : एका ग्लास उकळलेल्या दुधामध्ये खजूर मिक्स करा. यामुळे वजन वाढण्यास मदत होते आणि शरीराची ताकद देखील वाढते. जर आपल्याकडे खजूर नसेल तर आपण खारीक देखील घेऊ शकतो.
अंडी : अंडी चरबी आणि कॅलरीसह समृद्ध असतात. दररोज उकडलेले अंडे खाण्याने शरीर मजबूत बनते आणि आपण मजबूत दिसू लागता. यामुळे आपले वजनही वाढते.
हरभरा : काळा हरभरा भिजवून रोज खाल्ल्याने वजन वाढतं आणि शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. याशिवाय रात्री झोपताना एका ग्लास दुधात अश्वगंधा पावडर मिक्स करून प्या.
हे देखील लक्षात ठेवा : वजन वाढविण्यासाठी कधीही जंक फूड, फास्ट फूड किंवा औषधाचा सहारा घेऊ नका. या व्यतिरिक्त, काही लोकांची पातळपणा अनुवांशिक कारणांमुळे असतो. यामुळे, बरेच प्रयत्न करूनही वजन वाढत नाही. अशा परिस्थितीत आपण वरील पदार्थ खाऊन वजन वाढू शकतो.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Winter Diet | थंडीच्या दिवसांत रिकाम्या पोटी ‘या’ पदार्थांच्या सेवनाने राहील शरीर तंदुरुस्त!https://t.co/Znr5WfzLhp#Winter #diet #Food #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 11, 2020
(Include these foods in your diet and increase weight)
