झटपट वजन कमी करण्यासाठी नक्की फाॅलो करा ‘या’ टिप्स !

वाढलेल्या वजनामुळे प्रत्येक वयोगटातील व्यक्ती त्रस्त आहे. वाढलेल्या वजनामुळे आपण अनेक रोगांना निमंत्रणच देत असतो.

झटपट वजन कमी करण्यासाठी नक्की फाॅलो करा 'या' टिप्स !

मुंबई : वाढलेल्या वजनामुळे प्रत्येक वयोगटातील व्यक्ती त्रस्त आहे. वाढलेल्या वजनामुळे आपण अनेक रोगांना निमंत्रणच देत असतो. परंतु वजन कमी करण्यासाठी लोक योग्य प्रयत्न करीत नाहीत आणि जे वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात ते खाण्यावर नियंत्रण ठेवत नाहीत. यामुळे व्यायाम करू देखील काही फायदा होत नाही. खरोखरच वजन कमी करायचे असेल तर आजच आम्ही खास टिप्स देणार आहोत. त्या फाॅलो करून तुम्ही वाढलेले तुमचे वजन कमी करू शकता. (Follow special tips for weight loss)

मेथीची दाणे

जर तुम्हीही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात तर आजच आपल्या आहारामध्ये मेथीच्या दाण्यांचा समावेश करा. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. मेथीच्या दाण्यांमध्ये पुष्कळ पौष्टिक गुणधर्म असतात त्यामुळे आपली चरबी कमी होते. दररोज 10 ग्रॅम मेथीचे सेवन केले, तर शरीरावरची चरबी कमी होण्यास मदत होते. मेथीच्या दाण्यांमध्ये विद्रव्य फायबर आणि ग्लूकोमोनास फायबर असते.

हिरव्या भाज्या

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात जास्तीत-जास्त प्रमाणात हिरव्या भाज्या घ्या. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तसंच आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश आवर्जून करावा. वजन नियंत्रणात आणण्यासाठी भाज्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि शरीरातील कॅलरीज् देखील कमी होतात.

हेल्ही आहार

सकाळचा नाश्ता ते दुपारच्या जेवणादरम्यान फळं, नारळाचे पाणी, रस, ताक असे काहीतरी सेवन करा. दुपारच्या जेवणात प्रथम सलाड खा. त्यानंतर डाळ, 2 विनातेल चपात्या आणि हिरव्या भाज्या खा. चपाती बार्ली, हरभरा आणि गव्हाचे पीठ यांच्या मिश्रणाची असावी. चपातीसाठी मका, गहू, बाजरी हे त्या-त्या हंगामाप्रमाणे बदला. दुपारच्या जेवणानंतर चहा किंवा ग्रीन टी सोबत संध्याकाळच्या नाश्त्यात भाजलेले चणे, ढोकळा, डोसा यापैकी एखादा पदार्थ खा.

गोड खाणे टाळा

अनेकजणांना गोड खाण्याची इच्छा असते. मात्र, साखर खायची नाही, म्हणून ते मधासारखे पर्यायी पदार्थ शोधतात. असे लोक साखरेपेक्षा नैसर्गिकरित्या आढळणारे गोड पदार्थ चांगले आहे असं समजतात. मात्र, वास्तवात अशा गोड पदार्थांमध्ये कोणतेही अतिरिक्त पोषणद्रव्ये नसतात. शिवाय कॅलरिजचं प्रमाण देखील कमी नसतं. त्यामुळे साखर खाण्याऐवजी मध किंवा इतर गोड पदार्थ खाल्याने तसा काहीही फरक पडत नाही.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट देखील वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. चॉकलेटमध्ये बरेच पौष्टिक घटक आढळतात, विशेषत: डार्क चॉकलेट, ज्यामध्ये भरपूर कोको आणि फायबर असतात. डार्क चॉकलेटमध्ये झिंकची मात्रा सर्वाधिक आहे, जी शरीराचे 300 एन्झाइम्स सक्रिय करते. तसेच, चयापचय वाढवण्याचे काम करते. याव्यतिरिक्त, चॉकलेटमध्ये लोह, मॅग्नेशियम, तांबे, मॅंगनीज, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियमची मात्रा देखील भरपूर असते.

फॅट

कमी फॅट असलेले दही, प्रोटीन बार यांच्यात सॅच्युरेटेड फॅट्स आणि मीठ कमी असते. शिवाय प्रोटीन मुबलक प्रमाणात असतं म्हणून हे आरोग्यदायी मानले जाते. मात्र, नाश्त्यासाठी आरोग्यदायी समजल्या जाणाऱ्या पदार्थांचे अतिसेवन देखील तुमच्या वजनात घट करण्याऐवजी वाढच करू शकते.

(वजन कमी करण्यासाठी वर दिलेले उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

संबंधित बातम्या :

(Follow special tips for weight loss)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI