AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : पावसाळ्याच्या हंगामात ‘या’ पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा!

हवामान आता बदलत आहे पावसाळ्याची चाहूल लागत आहे. वातावरण देखील थंड झाले आहे. या हंगामात आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजेत.

Health Care : पावसाळ्याच्या हंगामात 'या' पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा!
निरोगी आहार
| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 3:00 PM
Share

मुंबई : हवामान आता बदलत आहे पावसाळ्याची चाहूल लागली आहे. वातावरण देखील थंड झाले आहे. या हंगामात आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजेत. आरोग्याबाबत या हंगामात निष्काळजी राहू नका. या काळात आपल्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. या हंगामात आपण निरोगी आणि सकस आहार घेतला पाहिजे. प्रत्येकाने कमी कॅलरी युक्त अन्न खाणे आवश्यक आहे.  (Include these foods in your diet during the rainy season)

पावसाळ्याच्या या हंगामात तळलेले-भाजलेले आणि मसालेदार अन्न खाल्याने पोटदुखी, जुलाब, मळमळ यासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे पावसाळ्यात आपल्या आरोग्याबरोबरच खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. आपल्या आहारात दही, ताक, लोणचेयुक्त भाज्या यासारख्या प्रोबायोटिक्स आणि फर्मेण्टेड म्हणजेच आंबवलेल्या पदार्थांचा समावेश करावा. प्रोबायोटिक्स एक चांगला बॅक्टेरिया आहे, जो आपल्या पोटात किंवा आतड्यांमध्ये राहतो.

हे जीवाणू आपल्या शरीरात वाढणाऱ्या आणि रोगांना कारणीभूत असलेल्या जंतूंचा नाश करतात. बाजरी, गहू, सोया, ज्वारी, नाचणी, मुग, आणि ब्राऊड राईसचा आहारात समावेश केला पाहिजे. या कडधान्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक घटक मिळतात. विशेष म्हणजे याचा समावेश आपल्या आहारात केल्यानंतर बराच काळ आपले पोट भरल्या सारखे वाटते. प्रथिने समृध्द असलेल्या खाद्यपदार्थामध्ये कॅलरी कमी प्रमाणात असते आणि पोट बर्‍याच काळ

भरल्यासारखे वाटते. याशिवाय प्रथिने स्नायू बनविण्यातही मदत करतात. पोहे, ओट्स, सोया, हरभरा, मूग, मसूर, अंडी इ आहारात घ्या. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश आवर्जून करावा. वजन नियंत्रणात आणण्यासाठी भाज्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि शरीरातील कॅलरीज् देखील कमी होतात.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include these foods in your diet during the rainy season)

राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.