Lactose Intolerance : गर्भधारणेदरम्यान दूध-दही पचत नाही? मग ‘या’ गोष्टींसह कॅल्शियमची कमतरता पूर्ण करा!

गर्भधारणेदरम्यान कॅल्शियमची खूप गरज असते. दुग्धजन्य पदार्थ जसे दूध, दही आणि चीज हे कॅल्शियमचे चांगले स्रोत मानले जातात. परंतु ज्यांना लैक्टोज असहिष्णुता आहे त्यांना दुग्धजन्य पदार्थ पचवण्यात समस्या होते. अशा परिस्थितीत शरीरातील कॅल्शियमची कमतरता कशी पूर्ण असा प्रश्न निर्माण होतो.

Lactose Intolerance : गर्भधारणेदरम्यान दूध-दही पचत नाही? मग 'या' गोष्टींसह कॅल्शियमची कमतरता पूर्ण करा!
दूध
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 8:15 AM

मुंबई : गर्भधारणेदरम्यान कॅल्शियमची खूप गरज असते. दुग्धजन्य पदार्थ जसे दूध, दही आणि चीज हे कॅल्शियमचे चांगले स्रोत मानले जातात. परंतु ज्यांना लैक्टोजची समस्या आहे. त्यांना दुग्धजन्य पदार्थ पचवण्यात समस्या होते. अशा परिस्थितीत शरीरातील कॅल्शियमची कमतरता कशी पूर्ण असा प्रश्न निर्माण होतो. जरी गर्भधारणेदरम्यान स्त्रियांना अनेक प्रकारचे पूरक आहार दिले जातात, परंतु फक्त त्यावर अवलंबून राहणे शक्य नाही. आज आम्ही तुम्हाला कॅल्शियम समृद्ध असलेल्या काही पदार्थांविषयी सांगणार आहोत. (Include these foods in your diet to eliminate calcium deficiency during pregnancy)

1. सोया दूध: हे दुग्धजन्य पदार्थांसाठी सर्वोत्तम पर्याय मानले जाते. जर तुम्ही दूध आणि दही घेऊ शकत नसाल तर सोया दुधाचे सेवन करा. हे सोयाबीनपासून बनवले जाते. कॅल्शियम व्यतिरिक्त, त्यात प्रथिने देखील भरपूर असतात.

2. बदाम: बदामांमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. कॅल्शियम व्यतिरिक्त, बदामांमध्ये फायबर, चांगले चरबीयुक्त मॅग्नेशियम, मॅंगनीज, प्रथिने आणि व्हिटॅमिन-ई असते. पण नेहमी भिजवलेले आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच बदामाचे सेवन करा.

3. संत्रा:  संत्री कॅल्शिययुक्त असते. संत्री खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दररोज एक संत्री खाल्ल्याने अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात. तसेच आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होण्यास मदत देखील होते.

4. टोफू: सोया दुधापासून तयार केलेल्या पनीरला टोफू म्हणतात. अर्ध्या कप टोफूमध्ये 126 ग्रॅम कॅल्शियम आढळते. आपण आपल्या आहारात नियमितपणे टोफूचा समावेश करू शकता.

5. ओट्स: ओट्स हे आजच्या काळात हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून घेतले जातात. एका कप ओट्समध्ये सुमारे 200 मिग्रॅ कॅल्शियम असते. शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही आहारात ओट्सचा समावेश करू शकता.

6. पालक: कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये पालकचा समावेश केला पाहिजे. हे शरीरातील कॅल्शियमसह लोहाची कमतरता देखील दूर करेल आणि रक्ताच्या कमतरतेपासून शरीराचे रक्षण करेल. परंतु गर्भधारणेदरम्यान काहीही वापरण्यापूर्वी एकदा तज्ञांचा सल्ला घ्या.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include these foods in your diet to eliminate calcium deficiency during pregnancy)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.