AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्याच्या हंगामात हेल्दी राहण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा आणि आजारांपासून दूर राहा!

पावसाळ्याचा हंगाम जवळपास सर्वांनाच आवडतो. परंतु तो आपल्याबरोबर बर्‍याच समस्या देखील आणतो. या हंगामात, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे आरोग्याची विशेष काळजी या हंगामात घ्यावी लागते.

पावसाळ्याच्या हंगामात हेल्दी राहण्यासाठी आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा आणि आजारांपासून दूर राहा!
पावसाळ्यात हेल्दी अन्न खा
| Edited By: | Updated on: Jun 29, 2021 | 1:06 PM
Share

मुंबई : पावसाळ्याचा हंगाम जवळपास सर्वांनाच आवडतो. परंतु तो आपल्याबरोबर बर्‍याच समस्या देखील आणतो. या हंगामात, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे आरोग्याची विशेष काळजी या हंगामात घ्यावी लागते. विशेष करून आपण या हंगामात काय खातो हे सर्वात महत्वाचे आहे. पावसाळ्यामध्ये बाहेरील अन्न आणि फास्ट फूड खाणे पूर्णपणे बंद केले पाहिजे आणि हेल्दी अन्न खाल्ले पाहिजे. (Include these foods in your diet to stay healthy during the rainy season)

हंगामी फळे

पावसाळ्यामध्ये पपई, लीची, सफरचंद, नाशपाती यासारख्या हंगामी फळांचे सेवन करावे. हे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि शरीराला आवश्यक पोषक पुरवते. आपण या गोष्टी सहजपणे आपल्या आहारात समाविष्ट करू शकता. हे फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहे. जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करते.

लसूण

लसूण एक सुपरफूड आहे, जे चयापचय वाढविण्यासाठी मदत करते. आपण डाळ, सांबर, रसम आणि इतर अनेक गोष्टींमध्ये याचा वापर करू शकता. तुम्ही लसूण, आले, जिरे, कोथिंबीर, हळद आहारात वापरू शकता, जे सर्दी आणि फ्लूसारख्या आजारांपासून संरक्षण करते.

कडू पदार्थ खा

आपल्या आहारात मेथी, कडुनिंब, कारले सारख्या गोष्टींचा समावेश करा. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते आणि आपल्याला हंगामी संक्रमणापासून दूर ठेवते. यात अ, क, बी, खनिजे, लोह, जस्त या जीवनसत्त्वे पोषक असतात. कडुलिंबामध्ये अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियाचे गुणधर्म आहेत जे बर्‍याच रोगांशी लढायला मदत करतात.

दही

दहीमध्ये प्रोबायोटिक गुणधर्म आहेत. जे आपल्यासाठी फायदेशीर आहेत. त्यात उपस्थित असलेले चांगले बॅक्टेरिया आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात. ह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. दररोज दही खाल्ल्याने केवळ ताजेतवाने वाटत नाही तर, पाचन तंत्रही ठीक राहते आणि पोटाचा त्रासही होत नाही.

मध

खोकल्याचा त्रास बराच काळ बरा होत नसेल, तर मधाचे सेवन करणे खूप उपयुक्त ठरू शकते. मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात, जे संसर्ग रोखतात. तसेच, मध कफ सहजपणे काढून टाकतो. आपण एखादा चमचा नुसता मधही खाऊ शकता. याशिवाय आल्याच्या रसामध्ये मध मिसळून खाल्याने कफ आणि खोकल्यात खूप आराम मिळतो.

पाणी

या हंगामात पुरेसे पाणी प्या. पाणी शरीरात उर्जा ठेवते. रोज सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी पाणी प्यावं. यामुळे शरीरातील सर्व विषारी पदार्थ सहजपणे बाहेर पडतात. त्यामुळे शरीरातील रक्तही शुद्ध होतं, ज्याचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होतो. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक येईल.

संबंधित बातम्या : 

चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?

Healthy Food For Typhoid | टायफॉइड तापात  ‘या’ 5 गोष्टींचे सेवन ठरेल लाभदायी

(Include these foods in your diet to stay healthy during the rainy season)

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप