Masala Oats : वजन कमी करायचे आहे? मग मसाला ओट्सचा आहारात समावेश करा, जाणून घ्या खास रेसिपी!

ओट्स हा एक असा पदार्थ आहे. जो आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणजे आपण नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणामध्ये कधीही ओट्सचे सेवन करू शकतो. ओट्समध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात.

Masala Oats : वजन कमी करायचे आहे? मग मसाला ओट्सचा आहारात समावेश करा, जाणून घ्या खास रेसिपी!
मसाला ओट्स

मुंबई : ओट्स हा एक असा पदार्थ आहे. जो आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणजे आपण नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणामध्ये कधीही ओट्सचे सेवन करू शकतो. ओट्समध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत. विशेष म्हणजे ओट्समुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला ओट्सची एक खास रेसिपी सांगणार आहोत. ज्याचे नाव मसाला ओट्स (Masala Oats) आहे. हे घरी कसे तयार करायचे हे जाणून घ्या.

मसाला ओट्सचे साहित्य

ओट्स – 1 कप

गाजर – 1

मटार – 1 कप

हळद – 1 टीस्पून

गरम मसाला पावडर – 1टीस्पून

तेल – 1 टेस्पून

हिरवी मिरची

लाल तिखट – 1 टीस्पून

धने पावडर – 1 टीस्पून

आवश्यकतेनुसार मीठ

हिंग

कांदा

शिमला मिरची 1

मसाला ओट्स तयार करण्याची पध्दत-

स्टेप – 1

कढईत तेल गरम करा. त्यात हिंग व चिरलेली हिरवी मिरची घाला. एक मिनिट भाजून घ्या.

स्टेप – 2

आता चिरलेला कांदा घालून परता. आता पॅनमध्ये चिरलेली गाजर, सिमला मिरची आणि मटार घाला. चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. 3-4 मिनिटे भाज्या तळून घ्या आणि आता लाल तिखट, धनेपूड, हळद आणि गरम मसाला असे बाकीचे मसाले घाला. चांगले मिसळा आणि आणखी दोन मिनिटे शिजवा.

स्टेप – 3

आता त्यात पाण्यासोबत ओट्स टाका आणि झाकण लावा. ओट्स पाणी शोषून घेईपर्यंत शिजवा. शिजवल्यानंतर, ओट्स गरमा-गरम सर्व्ह करा.

हे देखील महत्वाचे

ओट्समध्ये भरपूर फायबर असते. त्यात चरबीचे प्रमाण कमी असते. हा अतिशय पौष्टिक आहार आहे. यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यात मॅग्नेशियम आढळते. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. कारण ते सेरोटोनिन हार्मोन सोडते. यामुळेच आपल्या दररोजच्या आहारामध्ये ओट्सचा समावेश नक्की करा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..


Published On - 10:04 am, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI