AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात शेवग्याच्या शेंगा ठरतील फायदेशीर, आरोग्यदायी फायदे काय?

शेवग्याच्या झाडाला आरोग्यासाठी 'चमत्कारी वरदान' म्हणूनही ओळखले जाते, कारण या झाडांची पाने, फळे आणि फुले या सर्वांमध्ये औषधी गुणधर्म असतात. चला तर मग आजच्या लेखात आपण उन्हाळ्यात शेवग्याच्या शेंगा सेवन का करावे हे जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात शेवग्याच्या शेंगा ठरतील फायदेशीर, आरोग्यदायी फायदे काय?
drumstick
| Edited By: | Updated on: Apr 02, 2026 | 3:27 PM
Share

उन्हाळा सुरू झाला की वाढत्य उष्णतेमुळे पचनाच्या समस्या, थकवा, अशक्तपणा आणि वजन वाढणे या सामान्य समस्या निर्माण होतात. आयुर्वेदानुसार उन्हाळ्यात शेवग्याचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तसेच शेवग्याला ‘चमत्कारिक वरदान’ असेही म्हटले जाते, कारण या झाडाची पाने, फळे आणि फुले या सर्वांमध्ये औषधी गुणधर्म आढळतात. चला तर मग उन्हाळ्यात शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात ते जाणून घेऊयात.

शेवग्याच्या शेंगाचे सेवन शरीरासाठी फायदेशीर

शेवग्याच्या शेंगामध्ये जीवनसत्त्वे ए, बी, सी, कॅरोटीन, लोह, जस्त, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे या शेंगाचे सेवन उन्हाळ्यात शरीराला आतून थंडावा देते, पचनसंस्था मजबूत करते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

उन्हाळ्यात शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे

उन्हाळ्यात शेवग्याच्या शेंगा खाण्याचे केवळ एक-दोनच नव्हे, तर अनेक फायदे शरीराला होतात.

पोटासाठी फायदेशीर : शेवग्याच्या शेंगांमध्ये असलेले फायबर पोट स्वच्छ ठेवते, बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम देते. जड आहाराने बिघडलेले पचन सुधारण्यास शेवग्याच्या शेंगा मदत करते.

वजन : शेवग्याच्या शेंगा वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत करते. कारण याच्या सेवनाने चयापचय क्रिया वाढते, ज्यामुळे अन्न लवकर पचते आणि शरीरात अतिरिक्त फॅट जमा होण्यास प्रतिबंध होतो. शेवग्याच्या शेंगा फायबरने समृद्ध असल्यामुळे भूक नियंत्रित करण्यास आणि अति खाण्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

डिटॉक्स करण्यास फायदेशीर: वाढत्या उष्णतेमुळे शरीरात पाणी आणि विषारी द्रव्ये साठण्याची शक्यता असते. पण शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्याने नैसर्गिकरित्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकले जाते, सूज कमी करते आणि शरीराला हलके वाटायला मदत करते.

रक्तातील साखर : शेवग्याच्या शेंगा रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी संघर्ष करणाऱ्यांसाठी हे विशेषतः फायदेशीर आहे. उन्हाळ्यात थकवा जाणवणे सामान्य आहे.

ऊर्जा : शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी आढळतात, जे शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवतात आणि अशक्तपणा दूर करण्यासही मदत करतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते : उन्हाळ्यात आजार वेगाने पसरतात. यासाठी शेवग्याच्या शेंगांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने ते रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

शेवग्याच्या शेंगा खाण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती आहे?

उन्हाळ्यात तुम्ही शेवगांच्या पानांची भाजी करून त्यांचे सेवन करू शकता. शिवाय तुम्ही ही पाने सुकवून त्याची पूड करून पाण्यात मिक्स करून पिऊ शकता. ज्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.