Food : नाश्त्यासाठी घरच्या घरी तयार करा खास ढोकळा, जाणून घ्या रेसिपी!

| Updated on: Nov 30, 2021 | 10:34 AM

ढोकळा ही रेसिपी गुजरातची असून खाण्यासाठी अत्यंत चवदार आहे. विशेष म्हणजे हा ढोकळा घरी तयार करण्यासाठी आपल्याला 30 मिनिटांपेक्षाही कमी वेळ लागतो. ढोकळा आपण पातेल्यामध्ये करून वाफेने शिजवू शकतो. तसेच मायक्रोवेव्ह, ओव्हन किंवा प्रेशर कुकरमध्ये देखील तयार करता येतो.

Food : नाश्त्यासाठी घरच्या घरी तयार करा खास ढोकळा, जाणून घ्या रेसिपी!
ढोकळा
Follow us on

मुंबई : ढोकळा ही रेसिपी गुजरातची असून खाण्यासाठी अत्यंत चवदार आहे. विशेष म्हणजे हा ढोकळा घरी तयार करण्यासाठी आपल्याला 30 मिनिटांपेक्षाही कमी वेळ लागतो. ढोकळा आपण पातेल्यामध्ये करून वाफेने शिजवू शकतो. तसेच मायक्रोवेव्ह, ओव्हन किंवा प्रेशर कुकरमध्ये देखील तयार करता येतो. नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. लहान मुलांपासून ते घरातील सर्वांनाच ढोकळा खाण्यासाठी आवडेल. चला जाणून घेऊयात, ढोकळा बनवण्याची ही सोपी पद्धत आहे.

ढोकळा तयार करण्यासाठी साहित्य

1 कप बेसन

1 टीस्पून साखर

1 टीस्पून मीठ

1 टीस्पून तेल

1 टीस्पून मोहरी

3 कप पाणी

1 टीस्पून लिंबाचा रस

3/4 टीस्पून बेकिंग सोडा

कढीपत्ता

4 चिरलेल्या हिरव्या मिरच्या

कोथिंबीर

ढोकळा तयार करण्याची पध्दत-

स्टेप 1-

ढोकळ्याची ही सोपी रेसिपी बनवण्यासाठी एक मोठा वाडगा घ्या आणि त्यात बेसन, मीठ, पाणी, लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा मिक्स करा. हे सर्व साहित्य चांगले मिसळा. 1-2 तास पिठ आंबू द्या. त्यानंतर उकळलेले पाणी स्टीमरमध्ये ठेवा आणि भांडे तेलाने ग्रीस करा.

स्टेप 2-

ढोकळा पिठ ग्रीस केलेल्या भांड्यात ठेवा आणि स्टीमरमध्ये 15-20 मिनिटे मंद आचेवर शिजवा. डिश थंड होऊ द्या आणि नंतर त्याचे चौकोनी तुकडे करा.

स्टेप 3-

तडक्यासाठी एका पॅनमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करा. तेल पुरेसे गरम झाल्यावर त्यात मोहरी, कढीपत्ता आणि चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. कप पाणी घाला आणि उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर गॅस कमी करून लिंबू पिळून साखर व कोथिंबीर घाला.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..