Mung Bean Benefits : अंकुरलेले हिरवे मूग खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा सविस्तर!

डाळींचे सेवन शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. डाळही आरोग्य निरोगी ठेवण्याचे काम करते. अनेकदा आजारांमध्येही डॉक्टर प्रत्येकाला डाळीचे पाणी पिण्याचा सल्ला देतात. डाळी जितक्या हलक्या असतात तितक्या त्या निरोगी देखील असतात. डाळीमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात.

Mung Bean Benefits : अंकुरलेले हिरवे मूग खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा सविस्तर!
अंकुरलेले मूग
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 7:22 AM

मुंबई : डाळींचे सेवन शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. डाळही आरोग्य निरोगी ठेवण्याचे काम करते. अनेकदा आजारांमध्येही डॉक्टर प्रत्येकाला डाळीचे पाणी पिण्याचा सल्ला देतात. डाळी जितक्या हलक्या असतात तितक्या त्या निरोगी देखील असतात. डाळीमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात. जर तुम्ही हिरव्या मूग डागाचे सेवन करत असाल तर ते खूप फायदेशीर आहे.

जर तुम्ही हिरवे मूग अंकुरित स्वरूपात घेत असाल तर असे अनेक फायदे आहेत जे तुमचे शरीर निरोगी बनवण्यासाठी उपयुक्त आहेत. हिरवे मुग खाल्ल्याने शरीरातील अनेक प्रकारचे आजार दूर होतात. चला जाणून घेऊया अंकुरलेल्या मुगाचे सेवन केल्याने आपल्या शरीराला नेमके कोण-कोणते फायदे होतात.

मधुमेह नियंत्रित होतो

अंकुरलेल्या हिरव्या मूगाचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते रामबाण औषधापेक्षा कमी नाही. मधुमेही रुग्णांनी अंकुरलेले हिरवे मूग खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहण्यास मदत होते.

हृदयरोगापासून संरक्षण मिळते

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी अंकुरलेले हिरवे मूग सेवन केले पाहिजे. याचे सेवन केल्याने गंभीर आजार दूर होतात. जर तुम्ही हिरवे मूग सेवन केले तर तुमचे हृदय निरोगी राहू शकते.

fertility क्षमता वाढते

विवाहितांनी अंकुरलेल्या मूगाचे सेवन करावे असे म्हटले जाते. त्यामुळे प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होते. याच्या सेवनाने शरीर आतून ऊर्जावान राहते. त्यामुळे जर तुम्हाला प्रजनन क्षमता टिकवून ठेवायची असेल तर त्याचे सेवन हा एक चांगला पर्याय ठरेल.

फोलेटचा चांगला स्रोत

अंकुरित हिरवे मूग गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. गर्भधारणेदरम्यान स्त्रियांच्या शरीराला फोलेट नावाच्या पौष्टिक घटकाची गरज असते. अशा परिस्थितीत गरोदर महिलांना हवे असल्यास त्या आठवड्यातून दोनदा अंकुरलेली मूग खाऊ शकतात. परंतु ते आहारात समाविष्ट करण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

वजन कमी करण्यासाठी

जर तुमचे वजन वाढले असेल तर अंकुरलेले हिरवे मूग खा. यामुळे वजन कमी करण्यासाठी खूप मदत होते. अंकुरित हिरवे मूग खाल्ल्याने तुमच्या शरीरावरील चरबी वाढत नाही. खरं तर, त्याच्या वापरामुळे बराच काळ भूक लागत नाही, ज्यामुळे वजन संतुलित राहते.

संबंधित बातम्या :

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Mung Bean is extremely beneficial for health)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.