डाळिंब की बीट… शरीरात रक्त वाढवण्यासाठी कोणते आहे अधिक फायदेशीर? जाणून घ्या तज्ञांकडून

शरीरात रक्तांची कमतरता भरून काढण्यासाठी डाळिंब आणि बीट दोन्ही खूप फायदेशीर आहेत. काहीजण आहारात बीट सॅलडचा समावेश करतात, तर डाळिंबाचा रसाचे सेवन करतात. पण या लेखात आपण तज्ञांकडून जाणून घेऊयात की डाळिंब की बीट आरोग्यासाठी कोणते फायदेशीर आहे.

डाळिंब की बीट... शरीरात रक्त वाढवण्यासाठी कोणते आहे अधिक फायदेशीर? जाणून घ्या तज्ञांकडून
Pomegranate and Beetroot
Image Credit source: Getty Images
| Edited By: | Updated on: Oct 07, 2025 | 1:40 AM

आजच्या बदलत्या वातावरणामुळे व खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अने‍क आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आपल्याला अशक्तपणा जाणवू लागतो. यामुळे सतत थकवा, चक्कर येणे, अशक्तपणा येऊ शकतो. अशातच यासर्व समस्या जेव्हा तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असते तेव्हा निर्माण होतात. अशा परिस्थितीत शरीरात रक्ताची कमतरता भरून काढणे अत्यंत महत्वाचे आहे. तर अनेकवेळा तज्ञ तुमच्या आहारात हिमोग्लोबिन वाढवणारे पदार्थ समाविष्ट करण्याचा सल्ला देतात, विशेषतः डाळिंब आणि बीट. रक्त निर्मितीसाठी हे दोन्ही सुपरफूड मानले जातात.

आयुर्वेदापासून ते मॉर्डन न्यूट्रिशनपर्यंत अशक्तपणासाठी डाळिंबाची शिफारस केली जाते. अशातच बीटाचे सेवन हे रक्त शुद्ध करण्यासाठी ओळखले जाते त्यामुळे ते देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुमच्या आहारात बीटचे सॅलड किंवा त्याचा रस दररोज प्यायल्याने लोहाची कमतरता दूर होते. तर शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी डांळिब की बीट यापैकी कोणते अधिक फायदेशीर आहे? या संभ्रमात असाल तर आजच्या लेखात आपण याबद्दल तज्ञांकडून जाणून घेऊयात.

डाळिंबाच्या सेवनाने शरीरात रक्त वाढवते

डाळिंब हे पोषक तत्वांचा खजिना आहे. त्यात भरपूर लोह असते आणि त्यात जीवनसत्त्वे सी, ई, ए आणि अँटिऑक्सिडंट्ससह विविध पोषक तत्वे असतात. डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि नैसर्गिकरित्या हिमोग्लोबिन वाढविण्यास मदत करते. डाळिंबाचे अनेक फायदे देखील आहेत. हेल्थलाइनच्या मते शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासोबतच रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. डाळिंबात अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला सूर्यप्रकाशाच्या हानीकारक किरणांपासून वाचवतात आणि वृद्धत्व कमी करतात. मेंदूचे कार्य आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील डाळिंब फायदेशीर आहे.

लोहयुक्त बीट्स

बीटमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. तर बीटात लोह, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक तत्व असतात. बीट खाल्ल्याने शरीरात रक्तपेशींचे उत्पादन वाढते आणि नैसर्गिकरित्या हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. शरीरात रक्त वाढवण्यासाठी बीट खाणे खूप फायदेशीर मानले जाते. रक्त वाढवण्याव्यतिरिक्त, बीट रक्तदाब कमी करते आणि शरीरात रक्त प्रवाह वाढवते. लिवरला डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही बीटचे सेवन देखील करू शकता.

रक्त वाढवण्यासाठी कोणते चांगले आहे?

आहारतज्ज्ञांच्या मते डाळिंब आणि बीट दोन्ही रक्त वाढवण्यासाठी चांगले स्रोत आहेत. तथापि त्यांच्यातील लोहाचे प्रमाण बदलू शकते. एका मध्यम आकाराच्या बीटमध्ये अंदाजे 0.8 मिली लोह असते. डाळिंबाच्या बाबतीत एका मध्यम आकाराच्या डाळिंबात 0.3 मिली लोह असते. म्हणून, जर तुम्हाला फक्त तुमचे रक्त वाढवायचे असेल तर बीट हा चांगला पर्याय असू शकतो. तसेच तुम्ही बीट आणि डाळिंब यापासून ज्यूस तयार करून त्याचे सेवन करू शकता. हे देखील तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)