AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिस्पोजेबल ग्लास वापरून बनवा परफेक्ट चोकोबार, पाहा शेफ कुणाल कपूर यांचा भन्नाट जुगाड

उन्हाळ्यात चोकोबार आईस्क्रीम खायची आहे ते ही बाजारात मिळतात तसे, तर घरगुती पद्धतीने शेफ कुणार कपूर यांनी शेअर केलेली रेसिपी आज आपण या लेखात जाणून घेऊयात.

डिस्पोजेबल ग्लास वापरून बनवा परफेक्ट चोकोबार, पाहा शेफ कुणाल कपूर यांचा भन्नाट जुगाड
Chocobar ice cream recipe
| Edited By: | Updated on: May 14, 2026 | 8:18 PM
Share

उन्हाळा सुरू झाला की आपण सर्वांनी चोकोबार आईस्क्रीम खालेली असेलच. उन्हाळ्याच्या सुट्टीत तर हमखास चोकोबार आईस्क्रीम खातोच. अशातच हीच चोकोबार आईस्क्रीम तुम्हाला घरी बनवून खायची असेल तर याची सर्वात सोपी रेसिपी शेफ कुणाल कपूर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केलेली आहे.‍ ज्यात तुम्हाला चोकोबार आईस्क्रीमचा बाहेरील चॉकलेटचा कोटींग बनवणे कठीण वाटत असेल तर तो बनवणे अगदी सोपा आहे. त

उन्हाळ्यात आईस्क्रीमचा प्रत्येक घास ताजेपणा देतो आणि त्यातही चॉकलेट असेल तर ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच आवडते असते. एकदा तुम्ही घरी चोकोबार आईस्क्रीम बनवले की, तुम्हाला पुन्हा आईस्क्रीम पार्लरमध्ये जावेसे वाटणार नाही. चला तर मग, शेफ कुणाल कपूर यांची ही रेसिपी स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात.

घरी बनवलेले चोकोबार आईस्क्रीम

चोकोबारसाठी लागणारे साहित्य?

हे बनवण्यासाठी तुम्हाला सुमारे 1 कप डार्क चॉकलेट (बारीक केलेले), 1 मोठा चमचा खोबरेल तेल, 1/2 कप व्हिपिंग क्रीम, व्हॅनिला इसेन्सचे काही थेंब आणि 1/4 कप कंडेन्स्ड मिल्क लागेल.

चोकोबार आईस्क्रीम रेसिपी

  • प्रथम कापलेले डार्क चॉकलेट डबल बॉयलरमध्ये वितळवा (एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करा आणि त्यावर एका वाटीत चॉकलेट ठेवून वितळवा).
  • तुम्ही चॉकलेटमध्ये खोबरेल तेल देखील मिक्स करू शकता, कारण त्यामुळे त्याला चमक आणि मऊपणा येतो. तसेच आईस्क्रीमच्या बाहेरील चॉकलेटचा थर ब्रेक होत नाही.
  • दरम्यान चॉकलेट बार बनवण्यासाठी लहान डिस्पोजेबल ग्लास घ्या आणि त्यांना कात्रीने बाजूने उभे बारीक कापून घ्या.
  • ग्लास कापल्यानंतर त्यात वितळलेले चॉकलेट टाका आणि त्याला व्यवस्थित संपूर्ण ग्लासभर पसरवा. याप्रमाणे सर्व ग्लास तयार करा.
  • तयार केलेले सर्व ग्लास फ्रीझरमध्ये ठेवा, जेणेकरून चॉकलेट व्यवस्थित घट्ट होऊन त्याचे थर तयार होतील.
  • आता तुम्हाला शुगर-फ्री व्हिप्ड क्रीम घेऊन त्यात व्हॅनिला इसेन्स टाकावा लागेल आणि ते हलके व फुलके होईपर्यंत फेटून घ्या.
  • आता क्रीममध्ये कंडेन्स्ड मिल्क मिक्स करून पुन्हा थोडे फेटून घ्या, जेणेकरून क्रीम व्यवस्थित तयार होईल.
  • सर्व फ्रीझरमध्ये ठेवलेले ग्लास बाहेर काढा आणि आता यात व्हीप्ड क्रीमने काठोकाठ भरा.
  • आता संपूर्ण कप सिल्व्हर फॉइलने झाका. चाकूने मध्यभागी एक काप द्या आणि त्यात आईस्क्रीमच्या काड्या टाका.
  • हे कप कमीतकमी 4 तास फ्रीझरमध्ये ठेवा. या वेळेत तुमचे चॉकलेट बार व्यवस्थित सेट होतील.
  • आता कपातील रिकामी जागा उरलेल्या वितळलेल्या चॉकलेटने भरा. हे लगेच घट्ट होईल.
  • आता तुम्ही बनवलेल्या चोकोबार आईस्क्रीम डिस्पोजेबल ग्लास हलक्या हाताने काढून टाका. तुमचा बाजारात मिळणारा चोकोबार घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवून खाण्यास तयार आहे.
View this post on Instagram

A post shared by Kunal Kapur (@chefkunal)

टिप्स लक्षात ठेवा

या चॉकलेट बारला कुरकुरीतपणा आणण्यासाठी तुम्ही व्हीप्ड क्रीममध्ये चॉको चिप्स मिक्स करा. अधिक घट्टपणासाठी, तुम्ही त्यावर चॉकलेटचे दुहेरी आवरण लावू शकता. हे फ्रोझन आईस्क्रीम असल्यामुळे ते लवकर घट्ट होईल. थोड्या वेगळ्या चवीसाठी, तुम्ही व्हीप्ड क्रीमऐवजी घट्ट केलेले दूध वापरू शकता. तुम्ही कस्टर्ड पावडर आणि थोडे मिल्क पावडर देखील घालू शकता, ज्यामुळे तुमच्या आईस्क्रीमला कुल्फीसारखी चव येईल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा.

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा

Donald Trump :  युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ.

Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ

FIFA: ‘आम्हाला काहीच आयतं मिळालेलं नाही’, अर्जेंटीनाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरून मेस्सीचा संताप.

FIFA: ‘आम्हाला काहीच आयतं मिळालेलं नाही’, अर्जेंटीनाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरून मेस्सीचा संताप

Japan Open: पीव्ही सिंधुला 998 दिवसानंतर मिळाली आनंदाची बातमी, न खेळता थेट उपांत्य फेरीत जागा.

Japan Open: पीव्ही सिंधुला 998 दिवसानंतर मिळाली आनंदाची बातमी, न खेळता थेट उपांत्य फेरीत जागा

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या.

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या

गिलसोबत भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात योगदान, आता पोलिसांनी केली अटक.

गिलसोबत भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात योगदान, आता पोलिसांनी केली अटक