AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांना फिरायला नेताना ही वेळ टाळा, अन्यथा ओढवू शकते मोठे संकट!

अलीकडेच PETA ने एका अहवालात, उष्णतेमुळे मरण पावलेल्या पाळीव प्राण्यांच्या संख्येबद्दल माहिती दिली आहे. आपल्या पाळीव प्राण्याच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी उन्हाळ्यात आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांना फिरायला नेताना ही वेळ टाळा, अन्यथा ओढवू शकते मोठे संकट!
Pet care in summer
| Edited By: | Updated on: May 14, 2026 | 8:24 PM
Share

भारतातील काही राज्यांमध्ये तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. वाढत्या तापमानामुळे केवळ माणसांनाच नाही, तर पाळीव प्राण्यांनाही त्रास होतो. पेटाच्या (PETA) एका अहवालानुसार, 2025 मध्ये उष्णतेमुळे 140 पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला आणि जगभरात 365 प्राण्यांची उष्णतेपासून होणाऱ्या आजारावर उपचार करण्यात आले.तुम्ही जर प्राणीप्रेमी असाल किंवा तुमच्या घरी कुत्रा किंवा मांजर यांसारखे पाळीव प्राणी असेल, तर या वाढत्या उष्णतेत त्यांना सुरक्षित कसे ठेवायचे आणि कोणत्या चुकांमुळे पाळीव प्राण्यांच्या आरोग्याला नुकसान पोहोचते हे जाणून घ्या.

आपण वाढत्या तापमानामुळे घरात राहू शकतो, पण प्राणी आणि पक्ष्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे, आपल्या घराभोवती अन्न, पाणी आणि सावलीची सोय करणे महत्त्वाचे आहे. जर तुमच्याकडे मांजर किंवा कुत्रा यांसारखे पाळीव प्राणी असेल, तर तुम्ही त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. खरे तर जाणूनबुजून किंवा नकळत होणाऱ्या अनेक चुकांमुळे उन्हाळ्यात प्राण्यांच्या आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. चला तर मग, उन्हाळ्यात पाळीव प्राण्याची काळजी घेताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजे याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

थोड्या थोड्यावेळाने पाणी न बदलणे

दिवसातून अधिक वेळा घरातील कुत्र्या-मांजरांसाठी एक भांडे पाण्याने भरून ठेवतो, जेणेकरून त्यांना गरज असेल तेव्हा ते पाणी पिऊ शकतील. त्यातच फार कमी असे लोकं आहेत जे दुसऱ्या किंवा तिसऱ्यांदा भांड्यातील पाणी बदलतात. यामुळे पाणी केवळ गरमच होत नाही, तर त्यात घाणही साचते, ज्यामुळे तुमचा पाळीव प्राणी आजारी पडू शकतो. पाण्यावर थोडी जरी घाण किंवा मळ दिसल्यास, ते ताबडतोब बदला. खूप उष्ण दिवसांमध्ये आपल्या पाळीव प्राण्यांना थंड पाणी देणे उत्तम असते.

दिवसा बाहेर फिरायला नेणे

आजची जीवनशैली अशी आहे की लोकं रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी उशिरा उठतात. सकाळी उशिरा उठत असल्यामुळे अनेकदा पाळीव प्राण्यांना सकाळ ऐवजी दिवसा फिरायला घेऊन जातात, ज्यामुळे ते उष्णतेच्या संपर्कात येतात. आपल्या पाळीव प्राण्यांना सकाळी लवकर किंवा संध्याकाळी फिरायला घेऊन जाण्याचा प्रयत्न करा.

बंद गाडीत एकटे सोडणे

आजकाल तुम्ही सोशल मीडियावर असे व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील ज्यात कुत्र्यांना बंद गाडीत एकटे सोडून खरेदी करण्यास जातात. गाडीत एकटे सोडल्यास प्राण्याला उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागू शकतो आणि त्याचा गुदमरून मृत्यूही होऊ शकतो. जर गाडीबाहेरचे तापमान 40 अंश असेल आणि ती बराच वेळ उन्हात उभी असेल, तर गाडीच्या आतील तापमान 50-60 अंशांपर्यंत पोहोचू शकते. आपल्या पाळीव प्राण्याला गाडीत सोडुन जाण्याची चूक करू नका.

टिक फिव्हरकडे दुर्लक्ष करू नका

जसजशी उष्णता वाढते, तसतशी पाळीव प्राण्यांमधील गोचीड आणि पिसवांची समस्याही अधिक सामान्य होते. ही काही लहान समस्या नाही, कारण गोचीड तुमच्या पाळीव प्राण्याचे रक्त पितात, ज्यामुळे अशक्तपणा आणि आजारपण येते. पिसवांमुळे पाळीव प्राण्यांना त्रास होतो, ज्यामुळे ते चावू शकतात. तर उन्हाळ्यात तुम्ही गोचीड आणि पिसवांविषयी जागरूक असले पाहिजे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.) 

Follow Us
2029 च्या निवडणुकीबाबत आत्ताच दिला थेट संकेत; पुण्यातील कार्यक्रमात...
पुढच्या वेळीही आम्हीच येणार, 2029 च्या निवडणुकीबाबत CM फडणवीसांचे मोठे विधान काय?
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी ठाकरेंनी ऐकवला भाजप
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंनी ऐकवला भाजप नेत्याचा ऑडिओ; एकच खळबळ!
फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने?
मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी...
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी गर्दी
सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
मोठी बातमी! सुप्रिया सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे...
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे फक्त एक पद...
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंचे आमदार
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंच्या आमदाराची हजेरी, चर्चांना उधाण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा....
Viral Video | धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी....
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी शिवसैनिकांमध्ये बाचाबाची
Maharashtra Weather Update : राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, 24 तासात...

Maharashtra Weather Update : राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, 24 तासात..

आमच्या हातात तलवारी आणि तुमचा गळा असेल.. इराणमध्ये मोठा भडका, थेट राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्रीच...

आमच्या हातात तलवारी आणि तुमचा गळा असेल.. इराणमध्ये मोठा भडका, थेट राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्रीच..

Dhamaal 4 : खजिनाच हाती लागला; ‘धमाल 4’च्या कमाईत जबरदस्त वाढ, 9 दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला.

Dhamaal 4 : खजिनाच हाती लागला; ‘धमाल 4’च्या कमाईत जबरदस्त वाढ, 9 दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

चार्ट तयार झाल्यानंतरही मिळू शकते सीट तेही कन्फर्म, रेल्वेचा नवा नियम काय? वाचा सविस्तर.

चार्ट तयार झाल्यानंतरही मिळू शकते सीट तेही कन्फर्म, रेल्वेचा नवा नियम काय? वाचा सविस्तर

32 वर्षांपासून बेपत्ता आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध हिरो; पत्नीने केलं दुसरं लग्न, लेक बनली कोट्यधीश.

32 वर्षांपासून बेपत्ता आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध हिरो; पत्नीने केलं दुसरं लग्न, लेक बनली कोट्यधीश

Live Update : सोनम वांगचुक यांच्यासाठी ठाकरे गट मैदानात; मुंबईत आंदोलन करणार.

Live Update : सोनम वांगचुक यांच्यासाठी ठाकरे गट मैदानात; मुंबईत आंदोलन करणार