AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight loss : महागड्या प्रोटीन शेकऐवजी ‘हे’ खास पेय प्या आणि वाढलेले वजन कमी करा

आहारात प्रोटीनचा समावेश करणे खूप आवश्यक आहे. व्यायाम केल्यानंतर बरेच लोक प्रोटीन शेक पितात. यामुळे आपली व्यायाम करण्याची क्षमता वाढते आणि स्नायूं बळकट होण्यास मदत होते.

Weight loss : महागड्या प्रोटीन शेकऐवजी 'हे' खास पेय प्या आणि वाढलेले वजन कमी करा
प्रोटीन शेक
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 2:43 PM
Share

मुंबई : आहारात प्रोटीनचा समावेश करणे खूप आवश्यक आहे. व्यायाम केल्यानंतर बरेच लोक प्रोटीन शेक पितात. यामुळे आपली व्यायाम करण्याची क्षमता वाढते आणि स्नायूं बळकट होण्यास मदत होते. मात्र, बाजारात उपलब्ध बहुतेक प्रोटीन शेकमध्ये भेसळ असते जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. आज आम्ही तुम्हाला घरगुती आणि आरोग्यासाठी चांगले असलेले प्रोटीन शेक सांगणार आहोत. (Sattu extremely beneficial for weight loss)

प्रोटीन शेक

सत्तूमध्ये पुष्कळ पोषक घटक असतात. ही वनस्पती प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. सत्तू हे ग्लूटेन फ्री आहे जे कॅल्शियम, मॅंगनीज, लोह, मॅग्नेशियम समृद्ध आहे. जे स्नायूंना बळकट आणि दुरुस्त करण्यात मदत करते. 100 ग्रॅम सत्तूमध्ये 413 ग्रॅम एनर्जी कॅलरी, 3 ग्रॅम पाणी, कार्बोहायड्रेट्सचे 64 ग्रॅम, फायबरचे 18 ग्रॅम, 25 ग्रॅम प्रथिने आणि 5 ग्रॅम चरबी असते.

सत्तूचे पेय कसे तयार करावे

सत्तू

बीट पावडर

पाणी

जिरे

मीठ

लिंबू

प्रक्रिया : 

एक ग्लास सत्तूचा रस तयार करण्यासाठी सत्तू, बीट पावडर, एक ग्लास पाणी, जिरे लागतील. त्यामध्ये मीठ आणि लिंबू घाला आणि हे सर्व चांगले बारीक करून मिक्स करून घ्या आणि प्या. यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन मिळण्यास मदत होते. दरवेळी सत्तूचे खास पेय ताजेच तयार करा. एकदाच पेय तयार करून ठेवणे चुकीचे आहे.

सत्तूचे फायदे

व्यायामानंतर सत्तू पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कोणीही आपल्या आहारात याचा समावेश करू शकतो. सत्तू पाचक प्रणालीसाठी खूप फायदेशीर आहे. सत्तूमध्ये विद्रव्य फायबर असते, जे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त करण्यासाठी मदत करते. या व्यतिरिक्त, हे विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी कार्य करते.

त्वचेसाठी फायदेशीर

इतकेच नाही तर सत्तू तुमच्या त्वचा आणि केसांसाठीही चांगले आहे. दररोज सत्तूचा आहारात समावेश केल्याने केस गळतीची समस्या देखील कमी होण्यास मदत होते. यात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते जे त्वचेला चमकदार ठेवण्यास मदत करते.

टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या :

Skin Care | मसूर डाळीच्या फेसपॅकने उजळेल चेहऱ्याचे सौंदर्य, वाचा या फेसपॅकचे फायदे…

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Sattu extremely beneficial for weight loss)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली