रोजचा नाश्ता आणखी चविष्ट बनवायचाय? मग, ट्राय करा ‘या’ हेल्दी स्मुदी!

आता उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. यामुळे आता वेगवेगळे ज्सून आणि स्मुदी याची मागणी वाढली आहे.

रोजचा नाश्ता आणखी चविष्ट बनवायचाय? मग, ट्राय करा 'या' हेल्दी स्मुदी!
स्मुदी


मुंबई : आता उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. यामुळे आता वेगवेगळे ज्सून आणि स्मुदी याची मागणी वाढली आहे. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी कशी प्रकारे हेल्दी स्मुदी तयार करायची हे सांगणार आहोत. फळांची स्मुदी हा हेल्दी आणि चांगला ब्रेकफास्ट आहे. स्मुदीमध्ये फळे आणि भाज्या असतात ज्या सर्व महत्वाच्या पोषक घटकांनी परिपूर्ण असतात. चला तर मग पाहूयात घरच्या घरी कशाप्रकारे हेल्दी स्मुदी तयार करायची. (Special tips for making healthy smoothies at home)

उन्हाळा सुरू होताच सर्वांना आठवण होते ती म्हणजे आंब्यांची रसाळ आणि मधुर आंबे खाण्याची प्रत्येकालाच इच्छा असते. चवच नाहीतर आंबा खाणे आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतो. आंब्याची स्मुदी तर खाण्यासाठी अत्यंत अप्रतिम आहे. चला तर पाहूयात आंब्याच्या स्मुदीची रेसिपी…

स्ट्रॉबेरी स्मुदीमध्ये अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ, स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी स्मुदी निरोगी आणि आपल्या रोजच्या आहारासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी स्मुदी आहे. खाली दिलेली रेसिपी पाहा आणि घरच्या घरी तयार स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी स्मुदी

वजन वाढवसाठी केळीची स्मुदी किंवा शेक देखील खूप उपयुक्त आहे. सकाळी फक्त न्याहारीच्या वेळीच याचे सेवन करा. काही काळ नियमितपणे केळ्याचा शेक पिण्याने तुमचे वजन सुधारेल. तसेच, शरीरात लोह आणि कॅल्शियमचे प्रमाणही संतुलित होईल. परंतु, केळ्याची स्मुदी किंवा शेक बनवण्यासाठी केवळ ताजे मलईयुक्त दूध वापरा.

जेव्हा फळांचा विचार केला जातो, तेव्हा अॅवोकाडो एक आरोग्यासाठी उत्तम फळ आहे. ज्यात सर्व महत्वाची जीवनसत्त्वे आणि आहेत. जर आपण हे फळ आहारात समाविष्ट केले तर त्याचे अनेक फायदे आपल्याला होतात. तर पाहा मग अॅवोकाडोची ही खास स्मुदी रेसिपी

डाळिंबाची स्मुदी देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे रक्तदाब कमी होतो. डाळिंबाची सोपी स्मुदी रेसिपी पाहा आणि एकदा घरी नक्की करून पाहा.

संबंधित बातम्या : 

Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!

Snoring Issue | जाणून घ्या का उद्भवते घोरण्याची समस्या? ‘या’ सोप्या पद्धती वापरा आणि शांत झोपेचा आनंद घ्या…

(Special tips for making healthy smoothies at home)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI