शरीर ‘थंडा थंडा कूल कूल ठेवायचंय?, तर ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश हवा!

उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी, योग्य आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये पुरेसे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. केवळ पाणीच नाही तर काही पदार्थ आपल्याला हायड्रेटेड राहण्यास देखील मदत करतात.

शरीर 'थंडा थंडा कूल कूल ठेवायचंय?, तर 'या' पदार्थांचा आहारात समावेश हवा!
हेल्दी फूड

मुंबई : या हंगामात शरीराला थंड ठेवण्यासाठी, योग्य आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये पुरेसे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. केवळ पाणीच नाही तर काही पदार्थ आपल्याला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. उष्ण तापमानाशी लढण्यासाठी आपण काही औषधी वनस्पती देखील वापरू शकता. ज्यामुळे आपण या हंगामात देखील हायड्रेटेड राहू शकतो. (Summer Diet Cooling herbs help beat the heart)

पुदीना

पुदीना हा आपल्या आरोग्याासाठी खूप फायदेशीर आहे. हे आपल्याला थंड ठेवण्यास मदत करते. ताजी पुदिन्याची पाने अन्नाची चव वाढवतात. तसेच पुदिनाच्या पानाची चटणी बनवू शकता. पुदीन्याच्या पानांमध्ये मेन्थॉल, प्रथिने, चरबी, कर्बोदके, व्हिटामिन-ए, राइबोफ्लेविन, तांबे आणि लोह आढळते.

आवळा

आवळा जीवनसत्व सी समृद्ध आहे. हे पाचन तंत्र निरोगी ठेवते. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करते. त्यात अनेक पौष्टिक पदार्थ असतात. आवळा मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. हे रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करते. आवळा आपल्या आहारात अनेक प्रकारे समाविष्ट होऊ शकतो. आवळा रस, आवळा कँडी किंवा आवळा सुपारी, आवळ्याचे लोणचे याचा समावेश आपण करून शकतो.

चंदन

चंदन आपले शरीर थंड करण्यासाठी कार्य करते. ही औषधी वनस्पती पेस्टच्या स्वरूपात त्वचेवर वापरली जाऊ शकते. हे त्वचेच्या आरोग्याच्या अनेक समस्यांशी लढायला मदत करते.

कांदा

कांदे आपल्या शरीरास आतून थंड ठेवण्यास देखील मदत करतात. कच्चे कांदे खाल्ल्यास तोंडाची चव खराब होऊ शकते. म्हणून, त्यात लिंबू आणि मीठ मिसळून त्याची छान कोशिंबीर बनवा. आपण आपल्या भाज्या, आमट्या आणि रायत्यामध्ये देखील कांदा समाविष्ट करू शकता. लाल कांदा क्वेरसेटिनमध्ये समृद्ध आहे, जो एक नैसर्गिक अँटी- अॅलर्जीन मानला जातो.

मुळा

पचनक्रिया सुधारण्यासाठी मुळ्यातील फायबरयुक्त घटक उपयुक्त ठरतात. मुळा आपल्या आहारात कोशिंबीरीच्या रूपात समाविष्ट केल्यास बद्धकोष्ठता दूर होते. मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण देखील पुरेसे आहे. त्यामुळे शरीराची उष्णता दूर करण्यात मदत होते.

संबंधित बातम्या : 

Turmeric Side Effects | पोटाच्या समस्यांपासून ते मुतखड्यापर्यंत, ‘हळदी’च्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम!

Health Care | हवामान बदलतंय! अशाप्रकारे घ्या आपल्या आरोग्याची काळजी

(Summer Diet Cooling herbs help beat the heart)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI