आपल्या भारताची ‘ही’ फेमस कॉफी पितं अख्ख जगं, जाणून घ्या भारत किती कॉफी करते निर्यात?
आपल्यापैकी अनेकांची सकाळची सुरूवात चहा किंवा कॉफीने होत असते. पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारताची ही कॉफी सुंपर्ण जगभर प्रसिद्ध आहे. तर आजच्या लेखात आपण या खास कॉफीबद्दल तसेच भारत किती कॉफी निर्यात करतो? हे जाणून घेऊयात...

सकाळची सुरूवात म्हंटल की पहिले आपल्याला चहा किंवा कॉफी लागतेच. चहा-कॉफी पिण्याची ही एक सवय झालेली आहे. तसेच हे पेय अनेकांच्या आवडीचे असतात. तसं पाहिला गेलं तर आपल्या भारतात चहा प्रेमी भरपूर आहेत. मात्र कॉफी पिणाऱ्यांचाही वर्ग काही कमी नाहीये. त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या “मन की बात” या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मासिक रेडिओ भाषणच्या 127 व्या आवृत्तीत कॉफीचा उल्लेख केला. त्यानंतर त्यांनी भारतीय कॉफीच्या वाढत्या जागतिक लोकप्रियतेवर प्रकाश टाकत ओडिशाच्या कोरापूट ठिकाणांचा विशेष उल्लेख केला आहे. पंतप्रधानांनी ज्या प्रदेशाचा उल्लेख केला आहे त्या ठिकाणाहून कॉफीचा व्यवसाय मोठा प्रमाणात होतो. त्याच बरोबर कोरापूट ठिकाणाची ही कॉफी आपल्या भारताची प्रसिद्ध कॉफी आहे. या कॉफीची विशेषता म्हणजे अख्ख जगं ही कॉफी पितं. तर आजच्या लेखात आपण ओडिसाच्या कोरापूटची प्रसिद्ध कॉफीबद्दल तसेच आपला भारत देश कॉफी किती प्रमाणात निर्यात करते तेही जाणून घेऊयात.
कोरापूट कॉफी
कोरापुट येथे कॉफीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. तर या कॉफीची चव “अद्भुत” असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे. तर या कॉफीच्या चवीपलीकडे जाऊन कॉफीची लागवडमुळे स्थानिक लोकांना एक रोजगार उपल्बध झालेला आहे. यामुळे प्रत्येकाला या रोजगाराचा फायदाही होत आहे. तर कोरापूट ही कॉफी इतकी जग प्रसिद्ध झाली आहे की या शहराच्या तरूणांनी चांगल्या पगाराच्या कॉर्पोरेट नोकऱ्या सोडून कॉफीची लागवड करायला लागले आहेत. कारण ओडिसा कोरापूटची कॉफी इतकी प्रसिद्ध आहे की जगाच्या कानाकोपऱ्यात निर्यात केली जाते. त्याचबरोबर जगभरातून मोठ्या प्रमाणात कोरापूट कॉफीची मागणी होत असते.
कॉफी उत्पादन आणि निर्यात
कोरापूट हे त्याच्या अद्वितीय कृषी-हवामान परिस्थितीसाठी ओळखले जाते, जे उच्च दर्जाच्या अरेबिका कॉफीच्या लागवडीसाठी आदर्श आहे. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, राज्यात अंदाजे 5,000 हेक्टर जमिनीवर कॉफीची लागवड केली जाते.
ओडिसा आदिवासी विकास सहकारी महामंडळ लिमिटेड (TDCCOL)द्वारे ही कॉफी खरेदीकरून ती वाळवणे, ग्रेडिंग आणि मार्केटिंग पर्यंत संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थापित करते आणि उत्पादनाची गुणवत्ता सुनिश्चित करते.
भारतात प्रामुख्याने अरेबिका आणि रोबस्टा कॉफीची लागवड केली जाते. ज्यात कर्नाटकमध्ये राष्ट्रीय उत्पादनापैकी सुमारे 70% उत्पादन होते. त्यानंतर केरळ आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो.
आंध्र प्रदेश आणि ओडिसा सारखे अपारंपारिक क्षेत्र हळूहळू नवीन कृषी केंद्र म्हणून उदयास येत आहेत.
या आर्थिक वर्षात एप्रिल-सप्टेंबर दरम्यान भारताची कॉफी निर्यात 12.5% वाढून 1.05 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
