लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करतायत? मग, आजच आहारामध्ये ‘हे’ समाविष्ट करा

उन्हाळ्याचा हंगाम आता सुरू झाला आहे. उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणे अतिशय आवश्यक असते.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करतायत? मग, आजच आहारामध्ये 'हे' समाविष्ट करा
कलिंगड

मुंबई : उन्हाळ्याचा हंगाम आता सुरू झाला आहे. उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणे अतिशय आवश्यक असते. शरीरामध्ये पाण्याची कमी झाल्यानंतर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपण उन्हाळ्यात चांगल्या आहारावर जास्त भर देतो. मात्र, त्याचबरोबर उन्हाळ्यात अजून एक फळ जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजे ते म्हणजे कलिंगड खाण्याचे देखील अनेक फायदे आहेत. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, कलिंगड खाल्लयाने आपले वजन देखील कमी होते. (Watermelon is beneficial for weight loss)

कलिंगडमध्ये असलेले पाणी आणि फायबर पोट भरण्यास मदत करतात, ज्यामुळे डायट कंट्रोलमध्ये राहते आणि वजन कमी करण्यास ही मदत होते. कलिंगडमध्ये 90 टक्के पाणी असते, जे शरीरातील विषारी तत्व बाहेर काढतात. फक्त कलिंगड नाही, तर तर त्यांच्या बिया सुद्धा वजन कमी करण्यास मदत करतात. कलिंगडच्या बियांमध्ये लोह, झिंक, फायबर आणि प्रोटीनसोबत मायक्रोन्यूट्रियंटस असतात. बियांमध्ये खूप कमी कॅलरीज असतात. जर टरबूजमध्ये 4 ग्रॅम आहे, तर त्यात फक्त 23 कॅलरीज असतात.

-कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे उन्हाळ्यात शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात. यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर मन शांत राहते आणि शरीराला उर्जाही मिळते. म्हणून उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचा सल्ला डाॅक्टर देतात.

-बद्धकोष्ठता आणि गॅस ही एक मोठी समस्या बनली आहे जवळजवळ प्रत्येक माणूस यामुळे त्रस्त आहे. परंतु कलिंगडचे खाल्लाने केल्याने गॅस आणि बद्धकोष्ठतापासून मुक्तता मिळू शकते. कारण कलिंगड खाण्याने तुमचे पोट स्वच्छ राहते, यामुळे पाचन तंत्रही ठीक राहते आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

-उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असू नये. कारण पाण्याचे प्रमाण कमी होताच आपण आजारी होऊ शकतो. म्हणून शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड हा एक उत्तम पर्याय मानला जातो. कलिंगड पोट थंड ठेवते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत नाही.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(Watermelon is beneficial for weight loss)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI