आता वजन कमी करण्यासाठी बेचव अन्न खाण्याची गरज नाही!, टेस्टी फुड खा आणि वेटलॉस करा, वाचा सविस्तर…

वजन कमी करायचे म्हटले तर, त्यासाठी विशीष्ट डाएट फॉलो करणे गरजेचे असते. उकळलेल्या भाज्या अथवा बेचव अन्न खावे लागु नये यासाठी अनेकजन डाएट प्लॅन करत नाहीत. परंतु वजन कमी करण्यासाठी काही स्वादिष्ट पदार्थही खाता येतात त्याबाबत आपल्याला माहिती नसते.

आता वजन कमी करण्यासाठी बेचव अन्न खाण्याची गरज नाही!, टेस्टी फुड खा आणि वेटलॉस करा, वाचा सविस्तर...
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 4:39 PM

मुंबई : वजन कमी करणे सोपे काम नाही. यासाठी सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित व्यायाम (Exercise regularly) करणे देखील महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यात आरोग्यदायी आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. पाण्याने भरपूर भाज्या शरीराला डिटॉक्स (Detox the body) करतात. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात. त्यामध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात. उन्हाळ्यात ते शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत ज्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते, अशा भाज्यांपासून तयार केलेली कोशिबींर महत्वाची भूमिका पार पाडते. या भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते. यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. दह्यामध्ये प्रथिने जास्त आणि चरबी कमी असतात. त्यामुळे ही दही टाकलेली कोशिबींर पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. या सलादमुळे पचनक्रिया सुरळीत (Smooth digestion) राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

आरोग्यासाठी फायदेशीर

हे 4 स्वादिष्ट आणि हेल्दी सलाद वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत, त्यांची पद्धत जाणून घ्या, हेल्दी कोशिंबर लौकी म्हणजेच भोपळा आणि काकडीसारख्या भाज्यांपासून बनवलेल्या जातात. त्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यात अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात. या कोशिंबीरीमुळे पचनसंस्था निरोगी राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते. जाणून घेऊया, रायत्यापासून बनवलेल्या कोणत्या भाज्यांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.

काकडी पासून तयार केलीली कोशिंबीर

काकडीत जास्त प्रमाणात पाणी असते. हे शरीराला थंड ठेवण्याचे काम करते. त्यात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. काकडीची कोथिंबीर बनवण्यासाठी काकडी किसून घ्यावी. एक कप दही फेटून घ्या. ही काकडी दह्यात घाला. चवीनुसार मीठ, तिखट, भाजलेले जिरे आणि काळी मिरी घाला. ते चांगले मिसळा. आता ही स्वादिष्ट कोशिंबर खायला तयार आहे.

बीटरूटची रंगीत कोशिंबीर

यासाठी 1 ते 2 कप दही फेटून घ्या. त्यात किसलेले बीटरूट घाला. एक चमचा भाजलेले जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घाला. ते चांगले मिसळा. त्यात बारीक चिरलेला कांदाही घालू शकता. गुलाबी रंगाची ही कोशिंबीर सौम्य गोड आणि तिखट चवीची असते.

पुदिना कोशिंबीर

दह्यामध्ये कॅलरीज कमी असतात. यामुळे शरीराला दीर्घकाळ हायड्रेट राहते. पुदिना आणि दही वापरून तुम्ही स्वादिष्ट कोशिंबीर बनवू शकता. पुदिन्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. त्यात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. हा रायता बनवण्यासाठी १ ते २ कप दह्यात पुदिन्याची पाने घाला. त्यात मीठ आणि भाजलेले जिरे पूड घाला. ते मिक्स करून सेवन करा, ते पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.

दुधीभोपळ्याची कोशिंबीर

लौकी म्हणजेच दुधीभोपळा मध्ये भरपूर पाणी असते. उन्हाळ्यात याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ही कोशिंबर बनवण्यासाठी उकडलेला दुधी भोपळा चांगला मॅश करा. आता ते फेटलेल्या दह्यात मिसळा. त्यात हिरवी मिरची, काळे मीठ आणि जिरेपूड घाला. ते चांगले मिसळा.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.