घरासमोर फणा काढून नाग दिसला तर घाबरू नका… या 9 गोष्टी करा, चौथी आणि पाचवी गोष्ट महत्त्वाची
Cobra Snake: कोणाला नागांची भीती सर्वांत जास्त असते... घरासमोर फणा काढून नाग दिसला तर कधीच घाबरू नका किंवा त्याला मारण्याचा प्रयत्य करु नका... 'या' 9 गोष्टी करा ज्यामुळे तुमची देखील भीती होईल कमी...

Cobra Snake: पावसाळ्या नागांची भीती इतर दिवसांपेक्षा अधिक असते. विशेषतः जे लोक गावात, नदी – तलावाच्या कडेला, जंगलात राहतात त्यांच्यासाठी पावसाळ्याचे दिवस फार भीतीदायक असतात. कारण या दिवसांत नागांची भीती अधिक असते… सांगायचं झालं तर, नागांचे अनेक प्रकार आहेत. पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी भरल्यानंतर साप सुरक्षित जागेच्या शोधात असतात. अनेक साप असे देखील आहे जे विषारी असतात. अशा नागांपैकी एक म्हणजे कोब्रा… असं मानलं जातं की कोब्रा नाग स्वभावाने शांत आणि लाजाळू आहे, परंतु जर त्याला त्रास दिला तर तो स्वतःचा क्रूर रूप दाखवू शकतो. नागाचं विष इतकं विषारी असतं की जर तो एकदा चावला तर मृत्यू निश्चित आहे… असं समजा. जर तुम्हाला अचानक तुमच्या समोर, तुमच्या घराच्या, बागेच्या किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूच्या कोणत्याही कोपऱ्यात कोब्रा नाग दिसला, तर घाबरून न जाता, तुम्ही अशा प्रकारे हुशारी दाखवली पाहिजे…
कोब्रा दिसल्यास काय कराल…
– जर तुम्हाला कुठे कोब्रा दिसला तर घाबरण्याची काहीही गरज नाही… जर तुम्ही जागेवरून हालले नाही आणि त्याला जाण्यासाठी वाट करून दिली तर तो काहीही करणार नाही..
– चुकूनही कोब्राला मारण्याची, बाटलीत बंद करण्याची चूक करु नाका नाही तर, तुमच्या जीवावर बेतू शकतं…
-कोब्रा सामान्यतः जंगलात, शेतात आणि शहरी भागात आढळतात. त्याचं विष इतकं धोकादायक असतं की, ज्यामुळे मानवांच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
– कोब्रा जेव्हा त्याला धोका वाटतो तेव्हा हल्ला करतो. अशा परिस्थितीत, त्याच्या हल्ल्यापासून वाचण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शांतपणे उभं राहणं.
– कोब्राकडे कधीच सरळ नजरेने पाहू नका. अशा परिस्थितीत, तुम्ही त्याकडे थेट पाहू नका, तर डोळे खाली करून त्यावर लक्ष ठेवा. जर साप तुमच्या दिशेने येत असेल तर मागे न वळता हळू हळू मागे जा. यामुळे तुम्हाला कोब्रा कुठे आहे हे देखील कळेल. त्याच्या दिशेने थेट जाणं धोकादायक असू शकतं.
– कोब्रा सामान्यतः तेव्हाच हल्ला करतो जेव्हा त्याला असं वाटतं की तो लोकांनी वेढलेला आहे. अशा परिस्थितीत, गर्दीत उभं राहू नका. त्यांना जाण्यासाठी रिकामी जागा तयार करा. जोपर्यंत कोणी त्याला चिथावणी देत नाही किंवा मारण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत कोणताही साप मानवांवर हल्ला करत नाही.
– कोब्रापासून योग्य अंतर ठेवा, त्याच्या जवळ जाणं भीतीदायत असू शकतं… त्याच्यापासून 6 – 8 फूट लांब उभे राहा… जवळ गेल्या तो हल्ला करण्याची शक्यता अधिक असते.
-काही लोक सापाला पाहताच त्याला काठीने मारायला सुरुवात करतात. ते त्याला पोत्यात, ड्रममध्ये इत्यादींमध्ये बंद करण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्हाला कोब्रा दिसला तर नेहमीच सर्वमित्रांना बोलवा.
– तुमच्या घराबाहेर स्वच्छतेची काळजी घ्या. झाडे, झुडुपे, गवत, झुडुपे छाटत राहा जेणेकरून उंदीर, पक्षी इत्यादी इतर प्राणी तुमच्या घरापर्यंत येणार नाहीत. घराच्या भिंतींमध्ये किंवा इतरत्र कोणतेही छिद्र असेल तर ते बंद करा. संध्याकाळी खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा.
