AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kitchen Tips: स्वयंपाकघरात ठेवलेल्या ‘या’ 6 गोष्टी वेळोवेळी बदला, नाहीतर होतील वाईट परिणाम

Kitchen Tips: प्रत्येक घरातील किचनमध्ये असतात 'या' 6 गोष्टी, ज्या वेळोवेळी बदलणं आहे गरजेचं... नाहीतर होतील वाईट परिणाम... किचनमध्ये असलेल्या अनेक गोष्टींची काळजी घेणं आहे महत्त्वाचं...

Kitchen Tips: स्वयंपाकघरात ठेवलेल्या 'या' 6 गोष्टी वेळोवेळी बदला, नाहीतर होतील वाईट परिणाम
| Updated on: Feb 14, 2025 | 12:59 PM
Share

Kitchen Tips: घरातील किचनमध्ये अशा अनेक वस्तू असतात, ज्यांची काळजी योग्यप्रकारे घेणं फार महत्त्वाचं असतं. किचनमध्ये अशा काही गोष्टी असतात, ज्यांची शेल्फ लाईफ अधिक नसतात. त्यामुळे त्या वस्तू वेळीच बदलेल्या योग्य असतात. पण याबद्दल फार कोणाला माहिती नसतं. ज्यामुळे त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. लोकं कायम भाज्या आणि अन्य पदार्थ बदलत असतात. पण अशा काही गोष्टी आहेत, ज्या वेळीच बदलणं गरजेचं असतं. तर आज जाणून घेऊ अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या वेळीच बदलणं गरजेचं असतं.

किचनमध्ये असलेल्या ‘या’ 6 गोष्टी वेळीच बदला…

मसाले आणि औषधी वनस्पती – अनेक जण पूर्ण वर्षासाठी मसाले स्वयंपाकघरातील रॅकमध्ये साठवतात, विशेषतः संपूर्ण मसाले. पण ठरावीक वेळेनंतर मसाले वापरु नका. जर कोरडे संपूर्ण मसाले सैल असतील तर त्यांचा सुगंध निघून गेल्यावर ते स्वयंपाकघरातून काढून टाका.

किचनमधील फडकं – प्रत्येकाच्या किचनमध्ये सफाई करण्यासाठी फडका असतो किंवा गरम भांडी पकडण्यासाठी देखील फडक्याचा वापर होते. पण फडके जास्त काळ वापरू नये. कारण त्या फडक्यावर विषाणू जमतात. म्हणून किचनमधील फडके 4 ते 5 महिन्यांमध्ये बदलणं गरजेचं असतं.

नॉन स्टिक पॅन – नॉन-स्टिक पॅन लवकर साफ होते. हे किचनमधील काम सोपं करतं, परंतु ठरावीक वेळेनंतर, एकच भांडी दीर्घकाळ वापरल्याने त्यावरील कोटिंग हळू हळू निघू लागतं. यानंतर ही भांडी वापण्यासाठी योग्य नाहीत. या भांड्यांमुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

कटिंग-चॉपिंग बोर्ड – भाजीपाला आणि फळे कापण्यासाठी स्वयंपाकघरात वापरलं जाणारं साधन म्हणजे चॉपिंग बोर्ड. यावर भाजीपाला सहज कापला जातो. हे बोर्ड लवकर खराब होत नसले तरी त्यांचे शेल्फ लाइफ 1 वर्षापेक्षा जास्त नाही. त्यामुळे हे देखील वेळोवेळी बदललं पाहिजेत.

प्लास्टिक कंटेनर – प्रत्येकाच्या किचनमध्ये प्लास्टिकचे डबे असतात. प्लॅस्टिकचा वापर किचनत अजिबात फायदेशीर मानला जात नाही, पण तरीही भारतीय किचन असे काही डबे पाहायला मिळतात. त्यामुळे प्लास्टिकच्या डब्ब्यांचा वापर करणं टाळा…

भांडी घासण्याचा स्पंज – स्पंज किचनमधील सर्वात मोठा घटक आहे. भांडी घासण्यासाठी किंवा इतर कामांसाठी देखील स्पंजचा वापर केला जातो. ज्यामुळे त्यावर विषाणू असतात. शिवाय अनेक दिवस एकच स्पंज वापरल्यामुळे दुर्गंधी देखील पसरते. त्यामुळे स्पंज देखील सतत बदलणं गरजेचं आहे.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....