निस्तेज आणि शुष्क त्वचेमुळे निराश आहात?, मग किवीचा फेसपॅक ठरेल उपयुक्त; वाचा अधिक फायदे

| Updated on: May 26, 2021 | 1:16 PM

किवी खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप चांगले आहे. किवी फळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.

निस्तेज आणि शुष्क त्वचेमुळे निराश आहात?, मग किवीचा फेसपॅक ठरेल उपयुक्त; वाचा अधिक फायदे
त्वचा
Follow us on

मुंबई : किवी खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप चांगले आहे. किवी फळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यात कॅलरीचे प्रमाण खूप कमी आहे. हे आरडीएबरोबरच पोषकद्रव्ये पुरवते. किवीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक असतात. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. किवीचे त्वचेसाठी नेमके कोणते फायदे आहेत. हे जाणून घेऊयात (Kiwi face pack is beneficial for the skin)

त्वचा चांगली होते 

किवी त्वचेवर कोणत्याही प्रकारे लावू शकतो. किवीची बारीक पेस्ट करून देखील आपण चेहऱ्यावर लावू शकतो. यामुळे आपल्या त्वचेला आवश्यक असलेले पोषण घटक मिळतात.

मृत त्वचा काढून टाकते
किवी मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. त्याच्या सालामध्ये एक्सफोलीएटिंग गुणधर्म आहेत जे त्वचा तरुण आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. दररोज दिवसातून एकदातरी किवी आपल्या चेहऱ्यावर लावली पाहिजे.

मुरुमासाठी फायदेशीर 

किवी त्वचेतून बाहेर पडणारे सीबमला नियंत्रित करण्यात मदत करते. ज्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमाची समस्या कमी होते. या व्यतिरिक्त हे अँटी-एजिंगची लक्षणे कमी करण्यास देखील मदत करते. सुरकुत्या आणि बारीक पुरळ वाढण्यास प्रतिबंधित करते.

घरचे घरी किवीचा अशा प्रकारे वापर करा

किवी फेस मास्क

जर आपल्याला निरोगी आणि चमकणारी त्वचा हवी असेल तर आपण किवीचा फेस मास्क लावू शकता. यासाठी आपल्याला किवी सोलून बारीक करावी लागेल आणि मग हे मिश्रण चेहरा आणि मान वर लावावे. सुमारे 15 ते 20 मिनिटांनंतर पाण्याने धुवा.

किवी आणि बदाम फेसपॅक

किवी आणि बदामाचा फेसपॅक त्वचेसाठी खूप चांगला असतो. हा फेसपॅक तयार करण्यासाठी रात्री काही बदाम पाण्यात भिजवावे व सकाळी थोडे बेसन पीठ, बदाम आणि किवीची पेस्ट करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. त्यानंतर कोरडे झाल्यानंतर पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा. काही दिवसात चेहरा सुंदर दिसेल.

दही आणि किवी

दही आणि किवीचा फेसपॅक तयार करम्यासाठी आपल्याला किवीच्या पेस्टमध्ये थोडे दही घालावे लागेल. या दोन गोष्टी एकत्र करून पेस्ट बनवा. सुमारे 15 ते 20 मिनिटांनंतर ही पेस्ट धुवा. हा फेसपॅक आठवड्यातून दोन ते तीने वेळा चेहऱ्याला लावला पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Kiwi face pack is beneficial for the skin)