AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asthma | दम्याच्या रुग्णांमध्ये होतेय वाढ! वाचा काय आहेत याची कारणे, लक्षणे व उपाय…

अलीकडल्या काही काळात दम्याच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. दम्याला अस्थमादेखील म्हणतात.

Asthma | दम्याच्या रुग्णांमध्ये होतेय वाढ! वाचा काय आहेत याची कारणे, लक्षणे व उपाय...
दम्याला अस्थमादेखील म्हणतात.
| Updated on: Feb 10, 2021 | 10:35 AM
Share

मुंबई : अलीकडल्या काही काळात दम्याच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. दम्याला अस्थमादेखील म्हणतात. दमा हा फुफ्फुसातील श्‍वास वाहिन्यांशी संबंधित आजार असून, यात विशेषतः श्‍वास सोडण्यास त्रास जाणवतो. या आजाराची अनेक कारणे आहेत. शरीरात रक्ताची उणीव, हृदयविकार, निकामी मूत्रपिंड अथवा शरीरावर अतिरिक्त चरबी अर्थात लठ्ठपणा या कारणांमुळेही दम लागू शकतो. मात्र, त्याला दम्याचा आजार म्हणत नाहीत. फुफ्फुसाच्या आत असलेल्या श्‍वसनवाहिन्यांवर सूज आल्याने त्यांचा व्यास कमी होतो. त्यात स्राव वाढून वाहिन्या आकुंचन पावतात. अशा वेळी श्‍वास सोडताना त्रास होतो. एकूणच हा फुफ्फुसाचा आजार आहे (Know about asthma What is the disease, symptoms and prevention).

अस्थमाची समस्या असणाऱ्यांना फुफ्फुसापर्यंत व्यवस्थित ऑक्सिजन पोहचत नाही व श्वास घेण्यास त्रास होतो. याची व्यवस्थित काळजी न घेतल्यास ही समस्या अस्थमा अटॅकचे कारण ठरू शकते. अस्थमाचे लक्षण कसे ओळखायचे आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवायचे, याविषयी जाणून घेऊया.

कोणत्या कारणांमुळे होतो अस्थमा?

अस्थमाचा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. कधी कधी हा आजार अनुवांशिक देखील असू शकतो. घरात कुणाला दम्याचा आजार असेल, तर अन्य सदस्यांना दमा होण्याची शक्यता असते. दमा होण्यासाठी अ‍ॅलर्जी प्रामुख्याने कारणीभूत ठरते. एखाद्या गोष्टीची अ‍ॅलर्जी असेल व त्या गोष्टीचा वारंवार संपर्क आला अथवा अ‍ॅलर्जी असलेल्या गोष्टींचे सेवन केले, तर रक्तातील काही घटक वाढतात. त्यातील ‘इसोनिओफिल’ नामक घटक वाढतो. त्यामुळे श्‍वासवाहिन्यांवर सूज येते.

सोबतच धुम्रपान, वायू प्रदूषण, धूळ, धूर, कॉस्मेटिक प्रोडक्ट आणि अगरबत्ती या सारख्या सुगंधित वस्तूंपासून देखील अस्थमा होऊ शकतो. काही अँटी-बायोटिक औषधे, दैनंदिन जीवनातील तणाव आणि सिगरेटची सवय देखील अस्थमा होण्याची संभावना वाढवते (Know about asthma What is the disease, symptoms and prevention).

अस्थाम्याची लक्षणे

– श्वास घेण्यास समस्या

– श्वास घेताना शिटीचा आवाज येणे

– खोकला येणे

– छातीत दुखणे

– धाप लागणे

– श्वासाची घरघर

अस्थमा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ही सर्व लक्षणे दिसतीलच असे नाही. उदाहरणार्थ, काही व्यक्तींना खूप खोकला येण्यामुळे रात्री नीट झोप लागत नसेल, तर काही व्यक्तींना व्यायाम करताना धाप लागण्याचा अनुभव येत असेल. यासाठी या लक्षणांवर बारीक लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. मात्र, प्रत्येकवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे(Know about asthma What is the disease, symptoms and prevention).

उपचार

अस्थमा पुर्णपणे नाहीसा करण्यासाठी कोणताही उपचार नाही. मात्र, यावर नियंत्रण मिळवता येते. अस्थम्याला नियंत्रित करण्यासाठी औषधांचे नियमित सेवन करणे गरजेचे आहे. यासाठी इंहेलर्स सर्वात चांगले औषध आहे. इंहेलर्सने औषध थेट फुफ्फुसापर्यंत पोहचते, ज्यामुळे रुग्णाला आराम मिळतो.

अस्थमाच्या रुग्णाला आपल्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. औषध वेळेवर घ्यावीत, थंड आणि आंबट वस्तूंचे जास्त सेवन करून नये. धूळ, धूर आणि धुम्रपानापासून शक्य तितके लांब राहावे. पाळीव प्राणी जसे की कुत्रे, मांजर यांच्या जास्त संपर्कात येऊ नये. गादी, पडदे आणि सॉफ्ट टॉइज यावर धुळीचे कण सर्वाधिक असतात. त्यामुळे अशा वस्तूंपासूनदेखील लांब राहावे.

(Know about asthma What is the disease, symptoms and prevention)

हेही वाचा :

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.