Health | डोळ्यांनाही होऊ शकतो ‘पॅरालिसिस’! जाणून घ्या या मागची कारणे, लक्षणे व उपाय…

सध्या धावपळीचे आयुष्य आणि सतत कॉम्पुटरसमोर बसून काम केल्यामुळे डोळ्यांवर ताण पडत आहे. अशा परीस्थित उद्भवणारा असा एक गंभीर आजार म्हणजे डोळ्यांचा पक्षाघात अर्थात पॅरालिसिस.

Health | डोळ्यांनाही होऊ शकतो ‘पॅरालिसिस’! जाणून घ्या या मागची कारणे, लक्षणे व उपाय...

मुंबई : कधीकधी निष्काळजीपणामुळे किंवा आरोग्याबाबत पुरेशी जागरूकता नसल्यामुळे एखाद्या व्यक्तीला गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्यासोबातच शरीराच्या वेगवेगळ्या भागांची विशेष काळजी घेणे देखील गरजेचे असते. सध्या धावपळीचे आयुष्य आणि सतत कॉम्पुटरसमोर बसून काम केल्यामुळे डोळ्यांवर ताण पडत आहे. अशा परीस्थित उद्भवणारा असा एक गंभीर आजार म्हणजे डोळ्यांचा पक्षाघात अर्थात पॅरालिसिस. डोळ्याशी निगडीत हा एक गंभीर आजार आहे, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास एखाद्या व्यक्तीची दृष्टी पूर्णपणे प्रभावित होऊ शकते. चला तर, काय आहे हा रोग, त्याची लक्षणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती जाणून घेऊया…( Know about ophthalmoplegia also know as eye paralysis symptoms, causes and precautions)

काय आहे डोळ्यांचा पॅरालिसिस?

ऑक्युलर पॅरालिसिसला सामान्य भाषेत डोळ्यांचा अर्धांगवायू म्हणतात. हा एक गंभीर आजार आहे, ज्यामध्ये डोळ्यांच्या रेटीनाची हालचाल थांबते. ज्यामुळे, त्या व्यक्तीस कुठलीही गोष्ट पाहताना त्रास होण्यास सुरुवात होते. वास्तविक प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये 6 बाह्य स्नायू अर्थात ऑक्युलर मसल्स असतात. त्यापैकी 4 रेक्टाय आणि 2 ऑबलिक मसल्स आहेत. एक्स्ट्राऑक्युलर स्नायूंच्या मदतीने, एखादी व्यक्ती आपल्या डोळ्यांना उजवीकडून डावीकडे आणि वर खाली हलवू शकते. जर काही कारणास्तव, या एक्स्ट्राऑक्युलर स्नायूंना कोणताही त्रास झाला, तर डोळ्याच्या हालचालीवर थेट परिणाम होतो आणि व्यक्ती इच्छित असल्यासदेखील आपल्या डोळ्यांची गोलाकार हालचाल करू शकत नाही. या अवस्थेला डोळ्यांचा पॅरालिसिस म्हणतात.

डोळ्याच्या पॅरालिसिस लक्षणे :

– डोळ्यांमध्ये सतत वेदना आणि डोळ्यांमधून सतत पाण्याचा स्त्राव होण्यामुळे डोळे लालसर होणे.

– डोळ्यांच्या पुतळ्या अचानक एकाच दिशेने राहणे किंवा पापण्या बंद होणे.

– दुहेरी दृष्टी ज्यात एखाद्या व्यक्तीला एक वस्तू दोन दोन दिसतात.

– मळमळ आणि चक्कर येणे.

(Know about ophthalmoplegia also know as eye paralysis symptoms, causes and precautions)

या समस्येवरील उपचार

संयम ठेवा. 

ऑक्युलर पॅरालिसिसने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने त्वरित एका चांगल्या नेत्ररोग तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. लक्षात ठेवा की एखाद्या व्यक्तीस प्रारंभिक स्थितीत या गंभीर रोगावर सहज मात करता येणे शक्य आहे.

थेरपीने उपचार घ्या.

या समस्येवर उपचार करण्यासाठी सुरुवातीला पेन मॅनेजमेंटसह मिथाइलकोबाल्मीन आणि पायरीडोक्सिन या थेरपी फार प्रभावी आहेत.

व्यायाम आणि शस्त्रक्रिया

डोळ्यांच्या बाहुल्यांचे आंशिक विचलन सिनेप्टोफोर व्यायाम आणि प्रिज्म असलेल्या चष्म्याच्या वापराने सुधारले जाऊ शकते. जर 6 महिन्यांतही रुग्णाच्या डोळ्यातील विचलन योग्य झाले नसल्यास, अशा परिस्थितीत शस्त्रक्रियेचा पर्यायदेखील स्वीकारता येतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Know about ophthalmoplegia also know as eye paralysis symptoms, causes and precautions)

हेही वाचा :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI