Rose Oil Making Process | गुलाब तेलाचे भन्नाट फायदे, पण गुलाब तेल बनतं कसं ?

तुम्हाला माहित आहे का गुलाबपासून तेल देखील मिळते ? गुलाबपासून निघणाऱ्या या तेलाचा उपयोग अनेक प्रकारे केला जातो. पण गुलाबाच्या फुलांपासून तेल काढण्याची प्रक्रिया अतिशय कठीण आणि दीर्घकालीन आहे. तेल काढण्यासाठी लागणाऱ्या जास्त मेहनतीमुळे या तेलाची किंमत देखील जास्त आहे. चला तर मग जाणून घेऊया गुलाबपासून तेल काढण्याची प्रक्रिया आणि गुलाबाच्या तेलाचे फायदे.

Rose Oil Making Process | गुलाब तेलाचे भन्नाट फायदे, पण गुलाब तेल बनतं कसं ?
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सचिन पाटील

Oct 07, 2021 | 11:42 AM

मुंबई : महिलांना त्यांच्या सौंदर्यासाठी गुलाबाच्या फुलाची उपमा दिली जाते. या सुंदर गुलाबाचे बहुमूल्य असे उपयोग आहेत. आतापर्यंत तुम्ही गुलाब जल आणि खाद्यपदार्थ्यांमध्ये गुलाबाचा वापर केला असेल. पण तुम्हाला माहित आहे का गुलाबपासून तेल देखील मिळते ? गुलाबपासून निघणाऱ्या या तेलाचा उपयोग अनेक प्रकारे केला जातो. पण गुलाबाच्या फुलांपासून तेल काढण्याची प्रक्रिया अतिशय कठीण आणि दीर्घकालीन आहे. तेल काढण्यासाठी लागणाऱ्या जास्त मेहनतीमुळे या तेलाची किंमत देखील जास्त आहे. चला तर मग जाणून घेऊया गुलाबपासून तेल काढण्याची प्रक्रिया आणि गुलाबाच्या तेलाचे फायदे.

डीडब्ल्यू यांनी सादर केलेल्या एका अहवालनुसार, गुलाबपासून तेल काढण्यासाठी विशिष्ट वेळेची निवड केली जाते. गुलाबपासून तेल काढण्यासाठी जेव्हा गुलाबावरती दवबिदूं जमलेले असतात हा वेळ योग्य मानला जातो. दवबिदूं जमा झालेले गुलाब जमा करण्यासाठी भल्या पहाटेची वेळ आदर्श मनाली जाते. जेव्हा सूर्य उजाडतो तेव्हासूर्याच्या प्रखर किरणांमुळे गुलाबाच्या पाकळ्यावरील तेल उडून जाते. दवबिदूं जमा झालेल्या फुलांना तयार होण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी लागतो.

दवबिंदू जमा झालेल्या गुलाबाच्या पाकळ्या तोडल्यानंतर १२ तासांमध्येच त्या पाकळ्यांपासून तेल काढण्याची प्रक्रिया सुरू हो . ‘दमस्क’ या प्रकारच्या गुलाबाच्या फुलांचा वापर करून त्यांपासून तेल काढले जाते. पावसाळ्यामध्ये गुलाबांच्या फुलांवर मोठ्या प्रमाणात दवबिदूं साचते त्यामुळे पावसाळा हा ऋतू गुलाबपासून तेल काढण्याचा आदर्श काळ मानला जातो. जगामध्ये तुर्की येथे मोठ्या प्रमाणात गुलाबाची शेती केली जाते.

1 लिटर तेल काढण्यासाठी किती गुलाबांची आवश्यकता असते ?

गुलाबांपासून 1 लिटर तेल काढण्यासाठी 3 ते 4 टन गुलाबांची आवश्यकता असते. दवबिंदू असलेल्या गुलाबाच्या पाकळ्या तोडण्यासाठी अधिक कष्ट लागतात. म्हणजेच जर तुम्हाला एक लिटर तेल काढण्यासाठी 20 लाख गुलाबांची गरज भासते.

गुलाबांच्या तेलाची किंमत

गुलाबांच्या पाकळ्यांपासून तेल काढण्याची प्रक्रिया खूप कठीण आहे. त्यामुळेच या तेलाची किंमत देखील खूप महाग असते. अंतराष्ट्रीय बाजारामध्ये या तेलाची किंमत साधारण तीन लाखांपर्यंत आहे.

गुलाबांच्या तेलाचे उपयोग

गुलाबांच्या तेलाचा उपयोग अत्तर बनवण्यासाठी केला जातो. या व्यतिरिक्त अनेक ब्यूटी प्रोजक्ट्समध्ये ही गुलाबाच्या तेलाचा वापर केला जातो. टर्कीच्या स्पार्टा शहरात याचा व्यावसाय खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. गुलाबांच्या तेलाचा व्यतिरिक्त गुलाबाच्या पानांपासून बनणाऱ्या अनेक गोष्टी मिळतात. परंतू जास्त मेहनत आणि कमी मोबदल्यामुळे अनेकांनी या व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे.

इतर बातम्या

Health Tips : जाणून घ्या कोणत्या लोकांनी भोपळ्याच्या बिया खाऊ नयेत!

Superfoods for Skin : चमकदार त्वचेसाठी ‘या’ 5 सुपरफूडचा आहारात समावेश करा!

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारात समाविष्ट करा हे 7 उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ

 


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें