Diabetes : टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहामध्ये फरक काय, जाणून त्याची लक्षणे आणि लक्षणे

blood sugar : मधुमेह हा आताच्या घडीला सर्वाधिक झपाट्याने वाढणारा आजार बनला आहे. मधुमेह झाल्याने अनेकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. मधुमेह कशामुळे होतो. मधुमेहाची लक्षणे काय आहेत. मधुमेह टाईप १ आणि मधुमेह टाईप २ यामध्ये फरक काय आहे सविस्तर जाणून घ्या.

Diabetes : टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहामध्ये फरक काय, जाणून त्याची लक्षणे आणि लक्षणे
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 6:43 PM

Diabetes type : चुकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचा धोका झपाट्याने वाढत आहे. भारतात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. मधुमेहाचे दोन प्रकार आहेत. टाईप-१ आणि टाईप-२ मधुमेह. शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढले की मधुमेह होतो. टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहामध्ये काय फरक आहे. मधुमेह हा आता तरुणांमध्ये देखील वाढू लागला आहे. कोणत्याही वयात हा होऊ शकतो. टाईप-१ मधुमेह असलेल्या लोकांच्या शरीरात इन्सुलिन तयार होत नाही. टाईप-2 मधुमेहाने त्रस्त लोकांच्या शरीरात इन्सुलिन तयार होते परंतु आवश्यक तेवढे नसते. या दोन्ही प्रकारच्या मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असते.

टाइप-1 आणि टाइप-2 मधुमेहाची लक्षणे

टाइप-१ आणि टाईप-२ मधुमेहाची लक्षणे ही बऱ्यापैकी सारखीच असतात. टाइप-2 मधुमेहाच्या बाबतीत, लक्षणे लगेच दिसून येत नाहीत. यासाठी अनेक वर्षे लागतात. टाईप-2 मधुमेहाच्या रुग्णामध्ये अनेक वेळा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. टाइप 1 मधुमेहाची लक्षणे दिसू लागतात. काहीवेळा लक्षणे काही आठवड्यांत दिसू लागतात. टाइप-१ मधुमेह कोणत्याही वयात होऊ शकतो. ही सामान्य लक्षणे मधुमेहामध्ये दिसून येतात.

मधुमेहाची लक्षणे काय आहेत

वारंवार मूत्रविसर्जन

खूप तहान लागणे

खूप भूक लागणे

खूप अशक्त वाटणे

दृष्टी धूसर होणे

जखमा भरण्यास वेळ लागणे

स्वभाव चिडचिडा होणे

मूड बदलणे

अचानक वजन कमी होणे

हात आणि पाय सुन्न होणे

हातपायांना मुंग्या येणे

टाइप 1 मधुमेहाची कारणे काय

कौटुंबिक इतिहास देखील टाइप 1 मधुमेहाचे कारण असू शकते. अशा स्थितीत शरीर स्वादुपिंडातील पेशींवर हल्ला करते. त्यामुळे इन्सुलिन तयार होत नाही. आपली रोगप्रतिकारक शक्ती स्वादुपिंडातील इन्सुलिन तयार करणाऱ्या बीटा पेशींवर हल्ला करून त्यांचा नाश करते.

टाइप-2 मधुमेहाची कारणे

लठ्ठपणा, खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि आनुवंशिकता यांमुळेही टाइप-2 मधुमेह होऊ शकतो. टाईप-2 मधुमेहामध्ये, पेशी इंसुलिनशी सामान्यपणे संवाद साधू शकत नाहीत, परिणामी साखरेचा अपुरा पुरवठा होतो. तसेच स्वादुपिंड रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास सक्षम राहत नाही.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.