जाणून घ्या गुळाचा चहा पिण्याचे फायदे आणि तोटे…

जगभरात असे लोक क्वचितच आढळतील, ज्यांना चहा पिणे आवडत नाही. चहा पिणे प्रत्येकालाच आवडते.

जाणून घ्या गुळाचा चहा पिण्याचे फायदे आणि तोटे...

मुंबई : जगभरात असे लोक क्वचितच आढळतील, ज्यांना चहा पिणे आवडत नाही. चहा पिणे प्रत्येकालाच आवडते. जगभरात दिवसाची सुरुवात एका कप चहाने होते. अनेक लोक दिवसभर चहाचे बरेच कप रिचवतात. भारतातही प्रत्येक भागात आणि अगदी प्रत्येक नाक्यावर, चहा विक्रेते आणि चहाचे शौकीन दोघेही सहज दिसून येतात. बर्‍याच लोकांना बेडवरुण उठल्या उठल्या चहा पिण्याची अर्थात बेड टीची सवय देखील असते. ( Learn the advantages and disadvantages of drinking jaggery tea)

आता साखरेच्या चहापेक्षा गुळाच्या चहाला जास्त प्राधान्य दिले जाते . गुळचा चहा पिणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. परंतू गुळाचा चहा पिण्याचे फायदे किती आणि तोटे किती हे आज आपण बघणार आहोत

-साखरेच्या तुलनेत यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात, जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

-गुळाचा चहा घेतल्यास मायग्रेनमध्येही आराम मिळतो.

-गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळते. जर शरीरात रक्ताची कमतरता असेल, तर मग गुळाचा चहा तुमची ही समस्या दूर करेल.

– गुळाच्या अती सेवनानं रक्तातील साखरेचं प्रमाणही वाढतं. 10 ग्रॅम गुळामध्ये जवळपास 9.7 ग्रॅम इतकी साखर असते. त्यामुळं मधुमेहाच्या रुग्णांनी गुळाचं सेवन शक्यतो टाळलेलं बरं.

-अती गुळ खाणं ज्याप्रमाणं घातक ठरु शकतं त्याचचप्रमाणं खराब दर्जाचा आणि योग्य पद्धतीनं तयार न केला गेलेला गुळ खाणंही धोक्याचं ठरतं. त्यामुळं ही काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

-100 ग्रॅम गुळामध्ये जवळपास 385 कॅलरी असतात. त्यामुळं डाएट करणाऱ्यांनी याचं सेवन प्रमाणात करावं. पण, वजन वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी हे सेवन फायद्याचं ठरतं.

-नाकातून रक्तस्त्राव – गूळ मुळातच एक गरम पदार्थ आहे. त्यामुळं गरम वातावरणात याचं सेवन केल्यास अनेकदा नाकातून रक्त वाहण्यासही सुरुवात होते. पोटातील गरमी वाढल्यामुळं याचे परिणाम त्वचेवरही दिसून येतात.

संबंधित बातम्या : 

( Learn the advantages and disadvantages of drinking jaggery tea)

Published On - 9:00 am, Mon, 8 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI