Mahashivaratri 2021 | नक्षत्रांच्या पंचकादरम्यान साजरी होणार यंदाची महाशिवरात्री, जाणून घ्या काय आहे ‘हा’ मुहूर्त!

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला ‘महाशिवरात्री’ साजरी केली जाते. शास्त्रात हा दिवस खूप महत्वाचा असल्याचे सांगितले जाते. यावेळी महाशिवरात्री 11 मार्च रोजी येत आहे.

Mahashivaratri 2021 | नक्षत्रांच्या पंचकादरम्यान साजरी होणार यंदाची महाशिवरात्री, जाणून घ्या काय आहे ‘हा’ मुहूर्त!
महाशिवरात्री
Harshada Bhirvandekar

| Edited By: Nupur Chilkulwar

Mar 11, 2021 | 6:27 AM

मुंबई : फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला ‘महाशिवरात्री’ साजरी केली जाते. शास्त्रात हा दिवस खूप महत्वाचा असल्याचे सांगितले जाते. यावेळी महाशिवरात्री 11 मार्च रोजी येत आहे. या दिवशीच महादेव आणि माता पार्वती यांचे लग्न झाले होते, असे पुराणात म्हटले जाते. म्हणून, महाशिवरात्रीच्या दिवशी जो भक्त महादेवाची पूजा करतो आणि विधिनुसार व्रत करतो, त्याच्यावर महादेव लवकर प्रसन्न होतात आणि त्याची मनोकामना पूर्ण करतात (Mahashivaratri 2021 know about Panchak Muhurat and pooja muhurat).

परंतु, यावेळी महाशिवरात्री 2021 पंचक दरम्यान साजरी केली जाईल. घनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती या पाच नक्षत्रांच्या संयोजनास ‘पंचक’ असे म्हणतात. जेव्हा, चंद्र कुंभ आणि मीन राशीत संक्रमण करतो, तेव्हाच पंचक तयार होतो. परंतु, पंचक काळ शुभ मानला जात नाही. धर्मग्रंथात पंचक दरम्यान काही कामे करण्यास मनाई करण्यात आली आहे.

पंचक दरम्यान ‘ही’ कामे करण्यास आहे मनाई

धर्मग्रंथानुसार पंचकच्या वेळी दक्षिणेकडे प्रवास करणे आणि लाकडी वस्तू खरेदी करण्यास मनाई आहे. तसेच, या वेळी इमारत किंवा कामाच्या जागेची छप्पर उभी करू नयेत किंवा नव्याने बांधू नये. या नक्षत्रांच्या संयोजनात जर एखाद्याचा मृत्यू झाला, तर कुटुंबातील इतर सदस्यांनाही मृत्यूचा धोका किंवा तितक्याच मोठ्या दु:खाची भीती असते. हेच कारण आहे की, पंचक काळात अंत्यसंस्कार करताना विशेष खबरदारी घेतली जाते, जेणेकरून कुटुंबातील इतर सदस्यांना संभाव्य धोक्यांपासून वाचवता येईल (Mahashivaratri 2021 know about Panchak Muhurat and pooja muhurat).

किती वेळासाठी असेल पंचक काळ?

हा पंचक काल 11 मार्च रोजी सकाळी 9.21 वाजता सुरू होईल आणि 15 मार्चपर्यंत संपूर्ण दिवस असेल. यानंतर, तो 16 मार्च रोजी सकाळी 4.44 वाजता समाप्त होईल.

पूजेसाठी अत्यंत शुभ आहे महाशिवरात्री!

तथापि, महाशिवरात्रीचा दिवस व्रत आणि पूजेच्या दृष्टीने खूप शुभ असेल. या दिवशी चतुर्दशी तिथी 11 मार्च रोजी दुपारी 2:41 वाजल्यापासून ते 12 मार्च रोजी दुपारी 3:03 या वेळेत असेल. 11 मार्च रोजी सकाळी 9.24 वाजता शिव योग असेल. त्यानंतर सिद्ध योग सुरु होईल, जो 12 मार्च रोजी सकाळी 8:29 मिनिटांपर्यंत असेल. अशा प्रकारे, सिद्ध योगातून चतुर्दशी तिथीला प्रारंभ होईल. पण, महादेवचे भक्त 11 मार्च रोजी हा उपवास करतील.

अशा परिस्थितीत शिवयोगादरम्यान भक्तिभावाने जप करणे भक्तांसाठी चांगले ठरेल. दुसरीकडे, जर ते बर्‍याच काळापासून काही काम करण्याचा प्रयत्न करत असतील आणि ते काम पूर्ण होत नसेल तर, त्यांनी सिद्ध योगात महादेवासमोर त्यांची इच्छा बोलून, महादेवाची आणि माता पार्वतीची आदरपूर्वक पूजा केली पाहिजे. यामुळे त्यांना नक्कीच यश मिळेल.

(टीप : सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, याद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही.)

(Mahashivaratri 2021 know about Panchak Muhurat and pooja muhurat)

हेही वाचा :

शनैश्चरी अमावस्या : शनिच्या साडेसातीने त्रस्त आहात?, ‘हे’ उपाय करा, दूर होतील सर्व समस्या

Chanakya Niti : आयुष्यात पैसा टिकवायचा असेल तर ही आहे चाणक्य नीति, लक्ष्मी कधीही होणार नाही नाराज

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें