AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मटारपासून बनवा काही मिनिटांतच तयार होणारे ‘हे’ चविष्ट नाश्त्याचे पदार्थ, जाणून घ्या रेसिपी

मटार हे पोषक तत्वांनी समृद्ध असून आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. चला मटारपासून बनवलेले काही झटपट पदार्थांबद्दल जाणून घेऊयात जे चविष्ट आणि पौष्टिक दोन्ही आहेत.

मटारपासून बनवा काही मिनिटांतच तयार होणारे 'हे' चविष्ट नाश्त्याचे पदार्थ, जाणून घ्या रेसिपी
| Edited By: | Updated on: Jul 14, 2026 | 4:59 PM
Share

आजकाल अगदी बाराही महिने बाजारांमध्ये हिरवेगार, टपोरे आणि गोड मटार विकायला असतात. तर या हिरवेगार मटारची चव तर काही औरच असते. आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीत मटार म्हणजे ज्याला कोणी वाटाणे असे देखील म्हणतात, ही एक भाजी असून तिचा वापर विविध पदार्थांमध्ये केला जातो. त्यांची सौम्य गोड चव आणि मऊ पोत यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत व्यक्तींचे आवडते आहेत. म्हणूनच मटारपासून अनेक चविष्ट आणि झटपट नाश्ता बनवला जातो.

मटारमध्ये प्रथिने , फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट, लोह, पोटॅशियम आणि अनेक आवश्यक अँटीऑक्सिडंट्स असतात. मटारचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास, रोगप्रतिकारशक्तीला आधार देण्यास, पोट जास्त वेळ भरलेले ठेवण्यास आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवण्यास मदत होते. शिवाय त्यातील फायबर आणि प्रथिनांमुळे ते संतुलित आहाराचा एक आवश्यक भाग बनतात. चला मटारपासून बनवता येणारे काही चविष्ट आणि झटपट पदार्थ कसे बनवायचे ते जाणून घेऊयात.

मटारपासून बनवा हे 5 चविष्ट आणि झटपट स्नॅक्स

मटार पोहा

पोहे थोडे पाण्यात भिजवून बाजूला ठेवा. एका पॅनमध्ये मोहरी, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि कांदा परतून घ्या. त्यात उकडलेले मटार आणि हळद टाका, नंतर पोहे टाकून काही मिनिटे शिजू द्या. वरून लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाका. हा फायबर, प्रथिने आणि कर्बोदकांनी समृद्ध असलेला एक हलका आणि पौष्टिक नाश्ता आहे.

मटार चीला

उकडलेले मटार, कांदे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि मसाले बेसनच्या पिठात मिक्स करा. हे पीठ तव्यावर पसरवून दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. हा प्रथिने आणि फायबरने समृद्ध असा नाश्ता आहे, जो तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे ठेवण्यास मदत करू शकतो.

मटार सँडविच

उकडलेले मटार हलकेच कुस्करून घ्या आणि त्यात कांदे, शिमला मिरची, काळी मिरी आणि थोडे चीज टाका. हे मिश्रण गव्हाच्या किंवा मल्टीग्रेन ब्रेडमध्ये ठेवून पॅनमध्ये किंवा सँडविच मेकरमध्ये बेक करा. हा च‍विष्ट नाश्ता प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत असू शकतो.

मटाराचं कटलेट्स

उकडलेले मटार, उकडलेले बटाटे, गाजर, आले, कोथिंबीर आणि मसाले एकत्र करून टिक्की बनवा. त्यांना तव्यावर हलके तळा किंवा एअर फ्राय करा. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेल्या या पदार्थातून फायबर आणि अनेक आवश्यक पोषक तत्वे मिळतात.

मटार पराठा

उकडलेले मटार वाटून घ्या आणि त्यात कोथिंबीर, आले, हिरव्या मिरच्या आणि मसाले टाका. पिठाच्या गोळ्यात हे मिश्रण भरा, त्याचा पराठा लाटा आणि हलके तूप लावलेल्या तव्यावर भाजा. दही किंवा चटणीसोबत खाल्ला जाणारा हा पराठा चविष्ट आणि पोटभरीचा पर्याय आहे.

मटार खरेदी करताना आणि शिजवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

हिरवेगार मटार खरेदी करताना नेहमी ताज्या हिरव्या आणि पूर्ण भरलेल्या शेंगा निवडा. पॅकबंद किंवा फ्रोझन मटार खरेदी करत असल्यास पॅकेजवरील मुदतची तारीख नक्की तपासा. ताजे मटार फ्रिजमध्ये हवाबंद डब्यात किंवा छिद्र असलेल्या पिशवीत ठेवा, जेणेकरून त्यांचा ताजेपणा टिकून राहील. जास्त काळ ठेवण्यासाठी तुम्ही मटार हलके उकडून फ्रिजमध्ये ठेवा.

मटार जास्त वेळ शिजवल्याने त्यातील काही पोषक तत्वे, विशेषतः व्हिटॅमिन सी, कमी होऊ शकतात. त्यामुळे आवश्यकतेनुसार ते मध्यम आचेवर शिजवा. वापरण्यापूर्वी मटार पूर्णपणे धुवा आणि योग्य स्वच्छता राखा. संतुलित आहारात मटारचा समावेश करणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?