AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2024 Resolution: नवीन वर्षात करा हा एक संकल्प, सर्व आजारांपासून राहाल लांब

नवीन वर्षात प्रत्येकाने काहीतरी नवीन संकल्प केला पाहिजे. तुम्हाला जर आरोग्याशी संदर्भात काही समस्या असेल तर तुम्ही आजारांपासून लांब राहण्यासाठी काय करता येईल याबाबत संकल्प केला पाहिजे. आपला आहार आणि जीवनशैली यावर आपले आरोग्य अवलंबून असते. एक संकल्प तुमचंं आयुष्य बदलू शकते.

2024 Resolution: नवीन वर्षात करा हा एक संकल्प, सर्व आजारांपासून राहाल लांब
RESOLUTION
| Updated on: Dec 28, 2023 | 8:01 PM
Share

2024 Resolution : नवीन वर्ष सुरु होण्यासाठी काही दिवस उरले आहेत. १ जानेवारीला नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. नवीन वर्षात अनेक जण नवे संकल्प करतात. हे संकल्प पूर्ण झाले तर त्याचा आनंद वेगळाच असतो. त्यामुळे प्रत्येकाने नवीन वर्षात काहीतरी संकल्प केला पाहिजे. अनेक जणांना वर्षातून अनेक वेळा रुग्णालयात जावे लागते. पण जर तुम्ही या वर्षात आजारीच पडणार नाही असा संकल्प करत असाल तर ही बातमी तुमच्यालाठी आहे. कारण या वर्षात कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ज्यामुळे तुम्हाला ड़ॉक्टरकडे जाण्याची वेळच येणार नाही. आपला आहार आणि आपली जीवनशैली यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं.

नवीन वर्षात तुम्ही मोबाईलचा अतिवापर टाळण्याचा संकल्प करा. कारण मोबाईलने आपल्या आयुष्यात इतके मोठे घर केले आहे की त्याच्यापासून आपण राहूच शकत नाही. ज्यामुळे आपण इतर वेळेत देखील मोबाईलवर काहीना काही करण्यात गुंतलेले असतो. लहान मुले देखील मोबाईलच्या अतिवापरामुळे आजारी पडू लागले आहेत. रील बघण्यात तासनतास निघून जातात. यामुळे इतर कामांसाठी आपल्याला वेळच मिळत नाही. मोबाईलमध्ये व्यस्त असल्याने लोकं नाती देखील विसरले आहेत. अशा परिस्थितीत २०२४ या नवीन वर्षात आपण हा संकल्प केला पाहिजे.

पोश्चरची समस्या

जी लोकं मोबाईलवर तासनतास बोलतात, तासनतास गेम खेळतात किंवा सोशल मीडियावर वेळ घालवता. त्यांना शरीराच्या पोश्चरची समस्या येते. अशा लोकांना हात आणि खांदेदुखीची समस्या उद्भवते. मोबाईलच्या वापरामुळे अस्वस्थता निर्माण होते.

नैराश्य येणे

अनेक संशोधनात असे समोर आले आहे की, जे लोक स्मार्टफोनचा जास्त वापर करतात त्यांना चिंता आणि नैराश्याची समस्या जास्त असते. कारण तो इतका मोबाईलमध्ये गुंतलेला असतो की त्याला इतरांकडे व्यक्त व्हायला ही वेळ नसतो.

जास्त राग येणे

जी लोकं स्मार्टफोनचा अतिवापर करतात त्या लोकांचा स्वभाव चिडचिडा होत जातो. त्यांना लहान लहान गोष्टीत ही चिड येते. यामुळे नातेसंबंधावर देखील त्याचा परिणाम होतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या देखील उद्भवू शकते.

मुलांच्या मेंदूवर परिणाम

जी मुले लहान वयापासून मोबाइल पाहतात, त्यांच्या मेंदूच्या विकासावरही त्याचा परिणाम होतो. मोबाईल वापरणारी मुले आळशी, चिडचिडी आणि कमी शारीरिक क्रियाशील असतात. त्यांच्या मनावर देखील याचा परिणाम होतो.

फोकस न होणे

जी लोकं मोबाईलचा जास्त वापर करतात ते कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. फोनवर पुन्हा पुन्हा पाहण्याची सवय असते. सूचना तपासणे ही एक सवय बनते. यामुळे झोप खराब होते. काही लोक रात्री फोन वापरतात त्यामुळे झोप न येण्याची समस्या निर्माण होते.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.