AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केसांच्या वाढीसाठी ‘हा’ घरगुती हेअर स्प्रे वापरलात तर बाजारात मिळणाऱ्या महागड्या स्प्रेलाही विसराल

हा घरगुती हेअर स्प्रे केस गळतीवर एक वरदान आहे. जर तुम्हालाही बाजारात मिळणाऱ्या महागड्या हेअर स्प्रेंना कायमचा निरोप द्यायचा असेल तर आजच्या लेखात आपण नैसर्गिक हेअर स्प्रे घरी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.

केसांच्या वाढीसाठी 'हा' घरगुती हेअर स्प्रे वापरलात तर बाजारात मिळणाऱ्या महागड्या स्प्रेलाही विसराल
Hair CareImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: May 02, 2026 | 4:14 PM
Share

आजकाल केसांच्या समस्या सामान्य झाल्या आहेत. केस गळणे आणि कोंडा ही आपल्या सर्वांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. प्रदूषण आणि अयोग्य आहारामुळे केस अकाली पांढरे होत आहेत आणि केसांची वाढ खुंटत आहे. आपल्यापैकी बहुतेक जण महागडे हेअर स्प्रे आणि टॉनिक विकत घेऊन केसांचे उपचार करून घेतात. पण त्याचे परिणाम अनेकदा व्यर्थ ठरतात. तुम्हाला माहित आहे का की तुमच्या घराच्या आसपासत बाल्कनीतील काही अशी झाडं आहेत जे तुमच्या केसांच्या सर्व समस्या सोडवू शकतात. कडुलिंब, जास्वंद आणि कढीपत्ता हे असे तीन घटक आहेत जे तुमच्या केसांसाठी जादुई उपायांपेक्षा कमी नाहीत. चला तर मग हा हेअर स्प्रे कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.

हेअर स्प्रे करिता या तीन गोष्टी आहेत विशेष

कडुलिंब – कडुलिंबामध्ये जीवाणूनाशक गुणधर्म असतात. जर तुम्हाला डोक्याला खाज सुटत असेल किंवा कोंडा असेल तर कडुलिंब ते पूर्णपणे नाहीसे करण्यास मदत करू शकते.

जास्वंद – जास्वंदाची फुले आणि पाने व्हिटॅमिन सी ने समृद्ध असतात. त्यामुळे केस गळणे थांबण्यास आणि केसांना चमकदार बनविण्यात मदत होऊ शकते.

कढीपत्ता: कढीपत्त्यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि प्रथिने असतात, जे केसांची मुळे मजबूत करतात आणि अकाली केस पांढरे होण्यास प्रतिबंध करतात.

हेअर स्प्रे कसा बनवायचा?

साहित्य

कडुलिंबाची पाने

कढीपत्ता

जास्वंदीची फुले

पाणी

स्प्रे बाटली

पद्धत-

सर्वप्रथम कडुलिंब, जास्वंद आणि कढीपत्ता स्वच्छ पाण्याने चांगले धुवा, जेणेकरून त्यावर साचलेली धूळ निघून जाईल. नंतर एका पातेल्यात एक ग्लास पाणी गरम करा. पाणी उकळू लागल्यावर त्यात कडुलिंब, जास्वंद आणि कढीपत्ता टाका.

आता पाणी निम्मे होईपर्यंत आणि त्याचा रंग गडद हिरवा किंवा फिकट लाल (जास्वंदीमुळे) होईपर्यंत ते उकळवा.

आता गॅस बंद करा आणि हे पाणी पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर ते गाळून घ्या आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरा.

तुमचा घरगुती केस वाढवणारा स्प्रे तयार आहे.

याचा वापर कसा करावा?

हा स्प्रे वापरायला खूप सोपा आहे. झोपण्यापूर्वी किंवा केस धुण्याच्या 2 तास आधी तो तुमच्या स्कॅल्पवर भरपूर प्रमाणात स्प्रे करा. तसेच या स्प्रेमधील घटक केसांच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी 5 मिनिटे हळुवारपणे मालिश करा. त्यानंतर तुम्ही पाण्याने केस धुवून काढू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला...
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला मिळाली 292 मतं, तरी...
शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला गौप्यस्फोट
Sanjay Raut UNCUT | मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचं हसू खोटं? शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट
ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत माहिती
Big Breaking | ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत सर्वात मोठी अपडेट; राजकारणातील घडमोडींना वेग
विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व?
Vidhan Parishad Election Result | विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व?
सोलापूरात भाजपसाठी Good News; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील बड्या
सोलापूरात भाजपसाठी Good News; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील बड्या नेत्याचा पराभव करत दणदणीत विजय
दराडे आणि गीतेंमध्ये शाब्दिक चकमक; शिवीगाळ झाल्याचीही माहिती समोर
Nashik Gite Vs Darade Rada | दराडे आणि गीतेंमध्ये शाब्दिक चकमक; शिवीगाळ झाल्याचीही माहिती समोर, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या मनधरणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; कैलास पाटलांसह वरुण
ओमराजेंच्या मनधरणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; कैलास पाटलांसह वरुण सरदेसाई, 15 कोटी अन् बरंच काही...
नागपुरात भाजपचा झेंडा फडकला; राजीव पोतदार विजयी, काँग्रेसला मोठा धक्का
Nagpur Vidhan Parishad Result | नागपुरात भाजपचा झेंडा फडकला; राजीव पोतदार विजयी, काँग्रेसला मोठा धक्का
अखेर तेच घडलं! नाशिकमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये बिनसलं; नरेंद्र दराड
अखेर तेच घडलं! नाशिकमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये बिनसलं; नरेंद्र दराडे म्हणाले, शिंदेच...
नाशिकमध्ये राजकीय भूकंप! अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय
Nashik Gokul Gite | नाशिकमध्ये राजकीय भूकंप! अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय, महायुतीला धक्का