AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी नैसर्गिक घटकांपासून बनवा ‘हे’ पारंपरिक सरबत, जाणून घ्या रेसिपी

उन्हाळ्यात थंड पेय प्यायल्याने तुम्हाला त्वरित आराम मिळू शकतो, परंतु कार्बनयुक्त पेये टाळली पाहिजेत. आजच्या लेखात आपण नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या पारंपरिक सरबतांबद्दल जाणून घेणार आहोत, जे केवळ शरीराला आतून थंड ठेवत नाहीत, तर पोषक तत्वांनीही समृद्ध असतात.

उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी नैसर्गिक घटकांपासून बनवा 'हे' पारंपरिक सरबत, जाणून घ्या रेसिपी
Heat
| Edited By: | Updated on: Mar 24, 2026 | 8:51 AM
Share

उन्हाळ्याच्सा दिवसात उष्मघातापासून बचाव व्हावा यासाठी शरीराला हायड्रेटेड आणि आतून थंड ठेवण्याची गरज असते. त्यामुळे केवळ साधे पाणी पिण्याऐवजी आपल्या दैनंदिन दिनचर्येत आरोग्यदायी पेयांचा समावेश केला पाहिजे. भारतीय घरांमध्ये उन्हाळ्यात विविध नैसर्गिक घटकांपासून सरबत तयार केले जाते. जे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करून त्वरित ऊर्जा तर देतेच, शिवाय विविध पोषक तत्वेही पुरवते. ही सरबतं तुमचे पोट थंड ठेवतात आणि उष्माघातापासून संरक्षण करण्यापासून ते पचनक्रिया सुधारण्यापर्यंत अनेक फायदे देतात.

वेगवेगळ्या प्रकारच्या सरबतांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, त्यामुळे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी फ्रिजमधून थेट पाणी पिण्याऐवजी तुम्ही हे सरबत पिऊ शकता. या लेखात उन्हाळ्यातही थंड आणि निरोगी राहण्यासाठी काही नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या सरबताची झटपट रेसिपी जाणून घेऊयात.

बेलाच्या फळाचे सरबत

उन्हाळ्यात बेलफळाच्या गरापासून तयार सरबत पिणे उत्तम असते, कारण त्यामुळे शरीराला थंडावा तर मिळतोच, शिवाय उष्माघातापासूनही बचाव होतो. हे सरबत पचनासाठीही फायदेशीर असून त्वचेच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. पिकलेल्या बेलफळाचा गर काढून तो चांगला बारीक करून घ्या. त्यातील सर्व तंतुमय भाग काढून टाका. नंतर एका ग्लासात पाणी आणि बर्फाचे काही तुकडे मिक्स करा. आवश्यकतेनुसार बेलफळाचा गर त्यात टाका आणि त्यात गूळ किंवा साखर तसेच काळे मीठ, काळी मिरी आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकून मिक्स करा. अशाप्रकारे बेलाचे सरबत पिण्यास तयार आहे.

सत्तू सरबत

उन्हाळ्यात सत्तू शरबत सुद्धा उत्तम लागते. यासाठी, एका ग्लासात सत्तू घ्या, त्यात बर्फाचे तुकडे आणि पाणी टाकून चांगले ढवळा. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला, आणि लिंबाचा रस टाका. भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि काळे मीठ यांसारखे नेहमीचे मसाले टाकून सरबत तयार करा. तुमचे चविष्ट आणि प्रथिनयुक्त सरबत तयार आहे.

गुलाब सिरपचा सरबत

उन्हाळ्यात गुलाबाचा सरबत शरीराला थंड करण्यास त्वरित आराम देतो. यासाठी, तुम्ही बाजारातून गुलाब सिरप विकत घेऊ शकता किंवा घरात गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ करून पाण्यात उकळू शकता. त्यानंतर त्यात साखर आणि लिंबाचा रस टाकून त्यांचा सिरप तयार करू शकता. त्यात रोज इसेंस टाकू शकता. आता तयार मिश्रण एका काचेच्या बरणीत ठेऊ शकता आणि गरज असेल तेव्हा लगेच हे सिरप पाण्यात मिक्स करून प्या.

बडीशेप सरबत

सर्वप्रथम बडीशेप पाण्यात भिजवून रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी ती मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यात खडीसाखर वापरून सिरप तयार करा. मग तुम्ही दूध किंवा पाणी वापरून या सिरप पासून सरबत बनवू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?