AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी घरी अशाप्रकारे बनवा वॉटरप्रूफ काजळ

आजकाल बाजारात मिळणारे केमिकलयुक्त काजळ डोळ्यांना लावल्याने जळजळ, खाज सुटणे आणि लालसरपणा यासारख्या समस्या उद्भवतात. अशावेळेस तुम्ही जर घरी काजळ बनवून ते लावले तर ते तुमच्या डोळ्यांना सुंदर बनवेलच पण त्यांना सुरक्षितही ठेवेल. चला तर मग आजच्या लेखात आपण घरी काजळ कसे बनवू शकता तेही वॉटरप्रुफ ते जाणून घेऊयात.

तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी घरी अशाप्रकारे बनवा वॉटरप्रूफ काजळ
homemade-kajalImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Jan 05, 2026 | 8:09 PM
Share

मेकअप लूक पूर्ण करण्यासाठी काजळ लावणे महत्वाचं आहे. कारण काजळ तुमचे डोळे केवळ सुंदरच बनवत नाही तर डोळ्यांवरील घाण साफ करण्यासाठी देखील चांगले मानले जाते. तथापि बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक काजळांमध्ये केमिकल वापरले जाते. तर हे केमिकलयुक्त काजळ केवळ डोळे स्वच्छ करत नाहीत तर डोळ्यांना जळजळ होणे, खाज सुटणे यासारख्या समस्या देखील निर्माण करतात. बरेचजण वॉटरप्रूफ काजळच्या नावाखाली महागडे काजळ खरेदी करतात, परंतु त्यातील केमिकल हे संवेदनशील डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतात.

त्यामुळे सर्वात चांगली आणि सुरक्षित पद्धत म्हणजे घरीच घरगूती पद्धतीने काजळ बनवणे. जर तुमचे डोळे संवेदनशील असतील आणि तुम्ही रोज तुमच्या डोळ्यांना काजळ लावत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. तर आजच्या लेखात आपण घरी काजळ बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत जाणून घेणार आहोत, जी वॉटरप्रूफ आहे आणि तुमच्या डोळ्यांना नुकसान पोहोचवणार नाही.

घरगुती काजळ कसे बनवायचे?

घरगुती काजळ बनवण्यासाठी, प्रथम एक दिवा किंवा एक लहान स्टीलची वाटी घ्या. त्यात शुद्ध तूप किंवा नारळाचे तेल मिक्स करा. कापसाची वात थोड जाड ठेवा आणि ती पेटवा. आता एक स्वच्छ स्टीलची प्लेट किंवा वाटी दिव्यावर उलटी ठेवा जेणेकरून त्यातून निघणारा धुर त्या प्लेटवर जमा होईल. काही वेळाने प्लेटवर काळी काजळी जमा होईल. हे स्वच्छ चमच्याने काढा आणि त्यात 12 थेंब शुद्ध तूप किंवा बदाम तेल टाका आणि चांगले मिक्स करा. तुमचे नैसर्गिक आणि केमिकलमुक्त घरगुती काजळ तयार आहे.

घरगुती काजळाचे फायदे

घरगुती काजळ पूर्णपणे नैसर्गिक आहे, त्यामुळे डोळ्यांना जळजळ, खाज सुटणे किंवा लालसरपणा येत नाही. त्यात असलेले तूप किंवा तेल डोळ्यांना थंड करते आणि ओलावा टिकवून ठेवते. नियमितपणे आणि योग्यरित्या लावल्यास घरगुती काजळ डोळ्यांजवळील कोरडेपणा टाळतो आणि अनेकांच्या मते डोळ्यांचा थकवा कमी करण्यास मदत करतो. हे घरगुती काजळ केमिकल काजळांपेक्षा संवेदनशील डोळे आणि मुलांसाठी ते सुरक्षित मानले जाते.

घरगुती काजळ कसे लावायचे

घरगुती काजळ लावण्यापूर्वी तुमचे हात आणि डोळ्यांभोवतीचा भाग पूर्णपणे स्वच्छ करा. स्वच्छ काजळाची काडी, कापसाचा गोळा किंवा बोट वापरून, थोडेसे काजळ घ्या आणि ते पापण्यांच्या रेषेवर हळूवारपणे लावा. जास्त काजळ लावल्याने ते पसरू शकते, म्हणून कमी प्रमाणात काजळ लावणे चांगले.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?