AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Makeup myths : मेकअप च्या बाबतीत पसरलेल्या ‘या’ गैरसमजांवर अनेकदा विश्वास करतात महिला; जाणून घ्या, मेकअपशी संबधित ‘हे’ गैरसमज!

पार्टी किंवा इव्हेंटनुसार परफेक्ट लुक येण्यासाठी मेकअपशी संबंधित अनेक छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पण माहितीच्या अभावात महिला मेकअपशी संबंधित अनेक गैरसमजावर विश्वास ठेवतात. जाणून घ्या, मेकअपशी जुळलेले काही गैरसमज.

Makeup myths : मेकअप च्या बाबतीत पसरलेल्या ‘या’ गैरसमजांवर अनेकदा विश्वास करतात महिला; जाणून घ्या, मेकअपशी संबधित ‘हे’ गैरसमज!
सांकेतिक छायाचित्र
| Updated on: Aug 26, 2022 | 8:39 PM
Share

मुंबई : दैनंदिन जीवनात, स्त्रिया नो मेकअप लूकमध्ये (In a makeup look) दिसत असतील, परंतु एखाद्या खास प्रसंगासाठी चांगला मेकअप केल्याने, स्त्रियांना इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक आत्मविश्वास वाटतो. पार्टी किंवा इव्हेंटनुसार परफेक्ट लुक येण्यासाठी मेकअपशी संबंधित अनेक छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पण माहितीच्या अभावात महिला मेकअपशी संबंधित अनेक गैरसमजुतीवरही विश्वास ठेवतात. ज्यामुळे त्यांच्या त्वचेला हानी (Damage to the skin) पोहोचते. काही स्त्रिया रुटीनमध्ये मेकअप करतात, तर काही अधूनमधून त्यांच्या लूकमध्ये सौंदर्य वाढवतात. मेकअप तुम्हाला सुंदर बनवू शकतो, परंतु ते करण्यापूर्वी योग्य माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. काही वेळा योग्य माहितीशिवाय मेकअप केल्याने चेहरा काळवंडतो किंवा पिंपल्स येतात. तसे, मेकअपबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज (misunderstanding) पसरलेले आहेत. अनेक वेळा या गैरसमजुतीवर अवलंबून राहून महिला किंवा पुरुष त्यांचे नुकसान देखील करतात. जाणून घ्या, मेकअप च्या बाबत असेच काही गैरसमज.

गैरसमज: तेलकट त्वचेसाठी मॉइश्चरायझरची गरज नसते

तुमची त्वचा तेलकट असो की कोरडी याने काही फरक पडत नाही, तुम्ही दररोज त्वचा हायड्रेट ठेवली पाहिजे. त्वचेमध्ये तयार होणारे तेल सेबम असते आणि जर त्वचा मॉइश्चरायझ्ड नसेल तर, ती कोरडे होऊ लागते. मेकअप करताना मॉइश्चरायझर लावू नये असं लोकांना वाटतं, पण असा विचार करणं चुकीचं आहे. मेकअप लावण्यापूर्वी आणि काढल्यानंतर त्वचेवर मॉइश्चरायझर वापरावे.

गैरसमज: मेकअपमुळे मुरुमे होतात

मेकअपमुळे मुरुमे होऊ शकतात, पण यामागचे कारण काहीतरी वेगळे आहे. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही जास्त काळ चेहऱ्याचा मेकअप काढला नाही, तर चेहऱ्यावर मुरुमे होऊ शकतात. हा समज पसरवला जात आहे की, मेकअपनंतर नक्कीच पुरळ येईल, परंतु असा विचार करणे चुकीचे आहे.

गैरसमज: सनस्क्रीनची गरज नाही

असाही एक समज आहे की मेकअप करणाऱ्यांना सनस्क्रीन लावण्याची गरज नसते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही मेकअप करा किंवा न करा, त्वचेवर गरजेनुसार सनस्क्रीन लावलेच पाहिजे. सनस्क्रीन आपल्या त्वचेला टॅनिंगपासून वाचवण्यासोबतच इतर समस्यांपासूनही वाचवते.

गैरसमज: केवळ महाग उत्पादने चांगल्या दर्जाची असतात

मेकअप उत्पादनांची श्रेणी बदलते, काही महाग असतात आणि काही स्वस्त असतात. असा विश्वास आहे की, मेकअप उत्पादन जितके महाग असेल तितकी त्याची गुणवत्ता चांगली असेल. मेकअप उत्पादन तुमच्या त्वचेच्या प्रकाराला अनुरूप नसेल. परंतु तुम्ही, नेहमी मूळ उत्पादने वापरा.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.