पुरुषांनी किती दिवसाने नखं कापावीत? प्रत्येक व्यक्तीने…
या चार सोप्या हायजीन सवयींमुळे पुरुषांचं आरोग्य मजबूत होतं. नखं स्वच्छ ठेवणं, रात्री झोपताना अंडरवियर न वापरणं, तोंड स्वच्छ ठेवणं आणि रोज स्वच्छ अंडरवियर घालणं या गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्या प्रत्येकाने पाळल्या पाहिजे. नाही तर आजाराला निमंत्रण मिळू शकते.

पुरुषांच्या हेल्थ आणि हायजीनवर म्हणावी तेवढी चर्चा कधी होत नसते. पण छोट्या छोट्या सवयी मात्र आरोग्यावर परिणाम करत असतात. त्यामुळे आता डॉक्टरांकडून पुरुषांसाठी खास टिप्स दिल्या जात आहेत. आरोग्य आणि हायजीनवर भाष्य केलं जात आहे. पुरुषांचं आरोग्य चांगलं राहावं आणि कोणत्याही आजाराने त्रस्त होऊ नये म्हणून त्यांनाही स्वच्छतेचे धडे दिले जात आहेत. आरोग्य मंत्र सांगितला जात आहे. खासकरून चार अशा टिप्स आहेत की त्या प्रत्येक पुरुषाने पाळल्या पाहिजेत. नाही तर आरोग्य बिघडलेच म्हणून समजा.
नखं किती दिवसाने कापावीत?
महिलांच्या तुलनेत पुरुष आपल्या नखांकडे कमी लक्ष देतात. नखांमध्ये सर्वाधिक घाण राहते. तसेच सर्वाधिक बॅक्टेरिया नखांमध्येच जमा होतो. त्यामुळे नखे आठवड्यातून एकदा कापली पाहिजेत. घाणेरड्या नखांमध्ये टॉयलेट सीटपेक्षाही अधिक बॅक्टेरिया असू शकतो. हा बॅक्टेरिया खाण्यासोबत पोटात जातो. त्यामुळे पोटात इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक आठवड्यात कमीत कमी एकदा नखे कापली पाहिजे. नखातील जागा चांगली स्वच्छ ठेवली पाहिजे. त्यात मळ असता कामा नये.
अंडरवेअरशिवाय झोपा
डॉक्टरांच्या मते रात्री अंडरवेअर घालून झोपल्याने हवेचा प्रवाह कमी होतो. त्यामुळे गर्मी वाढते. ओलसरपणा येतो. त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे अंडरवेअरशिवाय झोपण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे हवेचा फ्लो कायम राहतो. स्किन ड्राय होते. इन्फेक्शनचा धोका कमी हतो. तसेच स्पर्म क्वॉलिटीही चांगली होते.
तोंडाची स्वच्छता…
सकाळी उठल्यावर तोंड स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे तोंडाचा वास येत नाही. खराब ओरल हायजीनचा हृदयावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दिवसातून दोनदा ब्रश करा. फ्लॉसचा वापर करा. तसेच जीभ स्वच्छ करणं विसरू नका.
रोज स्वच्छ अंडरवेयर घाला
एकच अंडरवेअर अधिक दिवस घालू नका. घाणेरड्या अंडरवेअरमुळे स्किन इन्फेक्शन होतं. वास, रॅशेज आणि फंगल प्रॉब्लेम येतात. त्यामुळे रोजच्या रोज धुतलेली स्वच्छ अंडरवेअर घाला. प्रत्येक सहा महिन्याला नवीन अंडरवियर घ्या.
