AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंब्याची कोय फेकू नका, त्वचा आणि केसांच्या समस्यांवर गुणकारी, जाणून घ्या फायदे

उन्हाळा आला की, प्रत्येकजण आंब्याच्या चवीचा आनंद घेतो. मात्र, फळ खाल्ल्यानंतर आंब्याची कोय आपण फेकून देतो. पण आंब्याची कोय केस आणि त्वचेसाठी फार गुणकारी आहे... त्यामुळे जाणून घ्या आंब्याच्या कोयचे काय आहेत फायदे.

आंब्याची कोय फेकू नका, त्वचा आणि केसांच्या समस्यांवर गुणकारी, जाणून घ्या फायदे
| Updated on: Jun 07, 2026 | 2:01 PM
Share

आंबा कोणाला आवडत नसेल, असं कोणीच नसेल. फळांचा राज आंबा वर्षातून एकदाच येतो, त्यामुळे आंब्याला मागणी देखील मोठी असते. आंबा चवीला तर उत्तम असतोच, पण आंब्याची कोय देखील आरोग्यासाठी फार गुणकारी आहे. अनेक जण आंबा खाल्ल्यानंतर कोय फेकून देतात. पण त्याचे होणारे फायदे फार कोणाला माहिती नाहीत. सांगायचं झालं तर, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आंब्याच्या कोयमध्ये त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेली अनेक अद्भुत पोषक तत्वे असतात. त्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे ए, सी, ई आणि फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात. हे नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने म्हणून काम करतात. त्यामुळे त्वचेच्या सौंदर्यासाठी काय फायदे आहेत जाणून घ्या.

त्वचेच्या काळजीमधील सर्वोत्तम औषध:

नैसर्गिक मॉइश्चरायझर: आंब्याच्या बियांपासून बनवलेले मँगो बटर, कोरड्या त्वचेच्या लोकांसाठी एक वरदान आहे. ते त्वचेला आतून आर्द्रता देऊन मऊ करते. तसेच ते एक्झिमासारख्या त्वचेच्या समस्या देखील कमी करते.

वृद्धत्वविरोधी गुणधर्म: यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, ई आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील फ्री रॅडिकल्सशी लढतात, त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि काळे डाग कमी होतात आणि अकाली वृद्धत्व टाळले जाते.

मुरुम प्रतिबंध: चेहऱ्यावर आंब्याच्या बियांची पावडर फेस पॅक म्हणून लावल्याने त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाते आणि मुरुमांची समस्या नियंत्रणात येते.

केसांसाठी देखील गुणकारी

केसांची वाढ: आंब्याच्या बियांमधील पोषक तत्वे टाळूतील केसांच्या मुळांना उत्तेजित करतात. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस अधिक वेगाने व दाट वाढतात.

कोंडा नियंत्रण: आंब्याच्या बियांचे तेल किंवा पावडर वापरल्याने टाळूचा कोरडेपणा कमी होतो आणि कोंडा पूर्णपणे नाहीसा होतो. यामुळे केस गळणे कमी होते आणि केसांना नैसर्गिक चमक येते.

केस पांढरे होण्यापासून प्रतिबंध: आंब्याच्या बियांची पावडर मोहरीच्या तेलात किंवा खोबरेल तेलात मिसळून, ते मिश्रण काही दिवस उन्हात ठेवून आणि हे तेल नियमितपणे डोक्याला लावल्यास कमी वयात केस अकाली पांढरे होणे कमी करता येते.

वापरण्याची पद्धत: आंब्याच्या बिया गोळा करा, त्या चांगल्या वाळवा आणि त्यातील कोय वाटून त्याची पूड करा. ही पूड दही, मध किंवा पाण्यात मिसळून फेस पॅक किंवा हेअर पॅक म्हणून वापरता येते. आंबे खाल्ल्यानंतर आता बिया फेकून देण्याची गरज नाही. त्या जपून ठेवा आणि घरात सहज उपलब्ध असलेल्या या नैसर्गिक उपायांनी तुमची त्वचा आणि केस निरोगी व सुंदर बनवा. पण कोणतेही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...