AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिंदगीभर पैशाची कमी पडणार नाही… फक्त ‘या’ 5 गोष्टी करा

प्रत्येकाला पैसा हवा असतो. पण सर्वांनाच पैशाचं आर्थिक नियोजन करता येतं असं नाही. आर्थिक नियोजन न केल्याने अनेकांची गणितं बिघडतात.

जिंदगीभर पैशाची कमी पडणार नाही... फक्त 'या' 5 गोष्टी करा
| Edited By: | Updated on: Nov 30, 2024 | 4:00 PM
Share

प्रत्येकाला पैसा हवा असतो. पण सर्वांनाच पैशाचं आर्थिक नियोजन करता येतं असं नाही. आर्थिक नियोजन न केल्याने अनेकांची गणितं बिघडतात. आयुष्यभर काम करूनही काहीच हाती न उरल्याने आयुष्याच्या संध्याकाळी मोठी ससेहोलपट होते. त्यामुळे महिन्याच्या शेवटी बचत करणे आवश्यक आहे, पण त्यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. आर्थिक नियोजन कसे करायचे? हातात पैसा कसा टिकवायचा याबाबतचे काही सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घ्या.  त्यामुळे आपल्याला मासिक खर्च आणि बचत यावर नियंत्रण ठेवता येईल.

खर्चाची तपशीलवार यादी करा

दर महिन्याला कुठे किती खर्च होतो, याची एक लिस्ट तयार करा. काही खर्च असे असतात जे दर महिन्याला ठरलेले असतात आणि ते बदलत नाहीत. या खर्चांपासून इतर खर्च वेगळे करा आणि त्यावर लक्ष ठेवा.

सामान्य बजेट तयार करा

खर्चांची यादी तयार केल्यानंतर, पुढचं पाऊल आहे बजेट तयार करणे. आपल्या उत्पन्नातून किती टक्के पैशांचा खर्च कोणत्या खात्यात केला जाईल, हे आधी ठरवून ठेवणे आवश्यक आहे. यामुळे अनावश्यक खर्च टाळता येईल आणि आपली बचत नियंत्रित ठेवता येईल.

आपत्कालीन फंड तयार करा

आपत्कालीन परिस्थितीपूर्वीच आपल्या उत्पन्नातून काही पैसे सुरक्षित ठेवा. त्यासाठी एक छोटासा बचत फंड तयार करा. जर अशा परिस्थितीमध्ये पैसे लागले, तर तुम्हाला हे पैसे मदतीला येऊ शकतात. मात्र, अत्यंत आवश्यक नसेल तोपर्यंत त्या पैशांचा वापर करू नका.

दायित्वांकडे लक्ष द्या

क्रेडिट कार्ड किंवा इतर कर्ज असताना खर्च करणे चांगले नाही, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. म्हणूनच, महिन्याच्या सुरुवातीला आपले कर्ज ताबडतोब फेडून टाका. आपल्या पैशांचा योग्य वापर करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.

बचत करा

आपल्या उत्पन्नातून किती पैसे बचत करायचे हे ठरवून ठेवले पाहिजे. आपला बचत उद्देश साध्य करण्यासाठी, सर्वात पहिलं त्या निश्चित पैशांचा भाग बाजूला ठेवा. यामुळे आपल्याला पैशाची थोडीथोडी साठवण करता येईल आणि आपली आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल.सर्वसाधारणपणे, योग्य नियोजन आणि नियमित देखरेखीमुळे मासिक खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि बचत करणे शक्य होते. थोड्या प्रयत्नांनी आपण आपल्या वित्तीय स्थितीमध्ये सुधारणा करू शकता.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा