एप्रिलमध्ये भारतातील ‘या’ अनोख्या ठिकाणांना द्या भेट, ट्रिप होईल मजेशीर

एप्रिल महिन्यात हवामान खूप आल्हाददायक असते. या महिन्यात फिरायला जाण्याची एक वेगळीच मजा असते. जर तुम्हीही एप्रिलमध्ये कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला काही सर्वोत्तम ठिकाणांबद्दल सांगत आहोत जे तुम्ही एक्सप्लोर करू शकता.

एप्रिलमध्ये भारतातील या अनोख्या ठिकाणांना द्या भेट, ट्रिप होईल मजेशीर
pachmarhi
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Apr 07, 2025 | 1:51 PM

एप्रिल महिना येताच हवामानात हलक्या उष्णतेसह आनंददायी बदल दिसून येतो. त्यामुळे या वातावरणात अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. तसेच प्रवास करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. जर तुम्हालाही रोजच्या धावपळीतून विश्रांती घ्यायची असेल आणि कुठेतरी शांततेचे क्षण घालवायचे असतील तर एप्रिल हा यासाठी सर्वोत्तम काळ ठरू शकतो. तसेच तुम्ही फिरायला जाण्यासाठी ठिकाण शोधत असाल तर आपल्या भारतात अशी काही अद्भुत ठिकाणे आहेत जिथे तुम्ही नैसर्गिक सौंदर्य, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक वारसा आणि ॲडव्हेंचरचा आनंद घेऊ शकता.

यावेळी जर तुम्हाला एप्रिलमध्ये काही अद्भुत ठिकाणे एक्सप्लोर करायची असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही खास ठिकाणे निवडली आहेत. ही ठिकाणे केवळ खूप सुंदर दिसत नाहीत तर येथे जाऊन तुम्हाला एक नवीन अनुभवही मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात…

नाहन (हिमाचल प्रदेश)

जर तुम्ही एप्रिलमध्ये शांत आणि सुंदर हिल स्टेशन शोधत असाल तर नाहन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. हिमाचल प्रदेशातील हे छोटे शहर डोंगर, हिरवळ आणि तलावांनी वेढलेले आहे. या ठिकाणचे शांत वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्य कोणालाही मोहित करू शकते असे सुंदर ठिकाण आहे. येथे तुम्ही रेणुका तलावाचा आनंद घेऊ शकता. तसेच तेथील फेम्स जाटौन धरणावर जाऊन फोटोग्राफी करू शकता.

वृंदावन (उत्तर प्रदेश)

जर तुम्हाला धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवासाला जायचे असेल तर वृंदावनपेक्षा चांगले ठिकाण कुठेच नाही. हे ठिकाण भगवान श्रीकृष्णाचे लीलाची मानले जाते आणि येथील रस्त्यांवर फिरण्यात एक वेगळाच आनंद असतो. एप्रिल महिन्यात येथील हवामान आल्हाददायक असते, ज्यामुळे भेट देण्याची मजा वाढते. जर तुम्ही इथे आलात तर बांके बिहारी मंदिर, प्रेम मंदिर, इस्कॉन मंदिराला नक्की भेट द्या. संध्याकाळी यमुना आरतीला उपस्थित राहा.

नैनिताल (उत्तराखंड)

उत्तराखंडमधील नैनिताल नेहमीच पर्यटकांमध्ये लोकप्रिय राहिले आहे. एप्रिल महिन्यात येथील हवामान खूप आल्हाददायक असते, खूप थंडही नसते आणि खूप गरमही नसते. हे ठिकाण तलाव, पर्वत आणि हिरवळीसाठी ओळखले जाते. येथे तुम्ही नैनी तलावावर बोटिंगचा आनंद घेऊ शकता. तसेच येथील नैना देवी मंदिराला भेट द्या. टिफिन टॉप हा येथील सर्वोत्तम दृश्य बिंदू आहे जिथून संपूर्ण दरी दिसते. स्नो व्ह्यू पॉइंटवरून हिमालयाची शिखरे स्पष्ट दिसतात.

पचमढी (मध्य प्रदेश)

जर तुम्ही मध्य भारतातील एक सुंदर हिल स्टेशन शोधत असाल तर पचमढी हे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. तिला ‘सातपुड्याची राणी’ असेही म्हणतात. हे ठिकाण त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, धबधब्यांसाठी आणि गुहांसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला पचमढीचा सर्वात सुंदर धबधबा, बी फॉल्स पाहता येईल. जटाशंकर लेण्यांचा एक्सप्लोर करा. तसेच तेथील धूपगडवरून सूर्यास्त पाहण्याचा आनंद घ्या