AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुधाच्या पिशव्यांपासून बनवा कंपोस्ट, प्रोसेस जाणून घ्या

प्लास्टिक पिशव्यांऐवजी पर्यावरणपूरक पॅकेजिंगमध्ये नंदिनी ब्रँडचे दूध विकण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. ही सेंद्रिय पाकिटे अवघ्या 90 दिवसांत कंपोस्टमध्ये रूपांतरित होतात.

दुधाच्या पिशव्यांपासून बनवा कंपोस्ट, प्रोसेस जाणून घ्या
Nandini Brand Milk Will Be Available In Eco friendly Packaging in marathiImage Credit source: tv9 marathi
| Edited By: Mayuri Sajerao | Updated on: Jul 24, 2025 | 12:36 AM
Share

नंदिनी दूध आता बायो डिग्रेडेबल पॅकेटमध्ये मिळणार आहे. प्लास्टिक पिशव्यांऐवजी पर्यावरणपूरक पॅकेजिंगमध्ये नंदिनी ब्रँडचे दूध विकण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. बेंगळुरूमधील पायलट प्रोजेक्ट मॉडेलच्या यशामुळे देशातील दुधाच्या पिशव्यांमधून होणारे प्रदूषण कमी होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

पाकिटे अवघ्या 90 दिवसांत कंपोस्टमध्ये रूपांतरित ही सेंद्रिय पाकिटे अवघ्या 90 दिवसांत कंपोस्टमध्ये रूपांतरित होतात. हे मॉडेल भारताच्या दूध उद्योगासाठी एक उदाहरण ठरू शकते. प्लॅस्टिकच्या तुलनेत ही सेंद्रिय पाकिटे केवळ 90 दिवसांत नैसर्गिकरित्या सेंद्रिय खतात रूपांतरित होऊ शकतात चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

प्रदूषण कमी होण्याचा मार्ग मोकळा कर्नाटक दूध महासंघाने (केएमएफ) आता प्लास्टिक पिशव्यांऐवजी पर्यावरणपूरक पॅकेजिंगमध्ये नंदिनी ब्रँडच्या दुधाची पाकिटे विकण्याचा निर्णय घेतला आहे. बेंगळुरूमध्ये मिळणारे नंदिनी दूध आता बायो डिग्रेडेबल पॅकेटमध्ये मिळणार आहे. ही पाकिटे कॉर्न स्टार्च, ऊस आणि इतर वनस्पती-आधारित सामग्रीपासून बनविली जातात. बेंगळुरूमधील पायलट प्रोजेक्ट मॉडेलच्या यशामुळे देशातील दुधाच्या पिशव्यांमधून होणारे प्रदूषण कमी होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

पॉलिथिलीन पाकिटांचे विघटन होण्यास 500 वर्ष प्लॅस्टिकच्या तुलनेत ही सेंद्रिय पाकिटे केवळ 90 दिवसांत नैसर्गिकरित्या सेंद्रिय खतात रूपांतरित होऊ शकतात, तर पारंपारिक पॉलिथिलीन पाकिटांचे विघटन होण्यास 500 वर्ष लागू शकतात. बेंगळुरू मिल्क युनियन लिमिटेडने पायलट प्रोजेक्ट म्हणून हा उपक्रम सुरू केला होता. हे मॉडेल भारताच्या दूध उद्योगासाठी एक उदाहरण ठरू शकते.

गळतीची समस्या नाही केएमएफचे व्यवस्थापकीय संचालक शिवस्वामी बी यांनी सांगितले की, आतापर्यंत पाकिटांमध्ये गळती झाल्याची कोणतीही तक्रार आलेली नाही, दुधाचा दर्जा राखला गेला आहे आणि ग्राहक पूर्णपणे समाधानी आहेत. दररोज २० ते २५ लाख प्लॅस्टिकची पाकिटे वापरली जातात. केएमएफचे मार्केटिंग डायरेक्टर रघुनंदन एम यांनी सांगितले की, दररोज 20 ते 25 लाख प्लास्टिक पॅकेट्स वापरली जातात. विक्रीनंतर कंपनीला दरवर्षी सुमारे १५ हजार मेट्रिक टन प्लास्टिकच्या पुनर्वापरावर मोठा खर्च करावा लागतो.

या नंदिनी दूध आता बायो डिग्रेडेबल पॅकेटमध्ये मिळणार आहे. आता पाकिटे कॉर्न स्टार्च, ऊस आणि इतर वनस्पती-बेस्ड कंटेंटपासून बनविली जात आहेत. बेंगळुरूमधील पायलट प्रोजेक्ट मॉडेलच्या यशामुळे देशातील दुधाच्या पिशव्यांमधून होणारे प्रदूषण कमी होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...