Skin care Tips : कोरड्या त्वचेवर ऑलिव्ह ऑईल रामबाण उपाय, वाचा याबद्दल अधिक !

Skin care Tips : कोरड्या त्वचेवर ऑलिव्ह ऑईल रामबाण उपाय, वाचा याबद्दल अधिक !
सुंदर त्वचा

उन्हाळ्याच्या हंगामात कोरड्या व निर्जीव त्वचेमुळे बहुतेक लोक त्रस्त असतात. बरीच उत्पादने वापरुनही काही विशेष फरक पडत नाही.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jun 02, 2021 | 10:41 AM

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात कोरड्या व निर्जीव त्वचेमुळे बहुतेक लोक त्रस्त असतात. बरीच उत्पादने वापरुनही काही विशेष फरक पडत नाही. त्यामध्येही तुमची त्वचा कोरडी असले तर समस्या आणखी वाढतात. कारण कोरड्या त्वचेला मॉइश्चराइझ ठेवणे फार कठीण आहे. मात्र, कोरड्या त्वचेसाठी ऑलिव्ह ऑईल अत्यंत फायदेशीर ठरते. कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकतो. (Olive oil is beneficial for the skin)

कोरडी त्वचा असलेले लोक ऑलिव्ह ऑईलचा वापर नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून करू शकतात. याशिवाय तुम्ही ऑलिव्ह ऑईल असलेले सौंदर्य उत्पादने देखील वापरू शकता. कोरड्या त्वचेला मऊ ठेवण्यासाठी आपण ऑलिव्ह ऑईल शीट मास्क वापरू शकता. हे ऑलिव्ह ऑईल शीट मास्क घरी देखील करू शकतो.

ऑलिव्ह ऑईलमध्ये निरोगी फॅटी अॅसिड असते. जे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून कार्य करते. हे त्वचेचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करते. ऑलिव्ह ऑईल त्वचेला लावल्यामुळे त्वचेतील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते. त्यात नैसर्गिक हायड्रेटिंग गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार दिसते.

कोरड्या त्वचेमुळे वृद्धत्व दिसण्याची अधिक शक्यता असते. हे टाळण्यासाठी ऑलिव्ह ऑईल वापरा. यात वृद्धत्वविरोधी गुणधर्म आहेत, जे बारीक सुरकुत्या आणि वृद्धत्वाची इतर लक्षणे कमी करण्यास मदत करते. ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे फ्री रॅडिकल्सशी काढण्यास मदत करतात. हे आपली त्वचा अधिक घट्ट करतात.

ऑलिव्ह ऑईलमध्ये अॅन्टी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात जे त्वचेचे छिद्र साफ करण्यास मदत करतात. याशिवाय मृत त्वचा काढून टाकल्याने चेहरा ताजा आणि चमकदार होतो. या व्यतिरिक्त ते मुरुमांवर उपचार करते आणि चेहऱ्यावर जमा झालेली घाण काढून टाकण्याचे काम करते.

ऑलिव्ह ऑईलने दररोज मालिश केल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते. मालिश केल्याने त्वचा चमकदार दिसते. तसेच रक्त परिसंचरण देखील वाढण्यास मदत होते. ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात आढळते. हे त्वचेची घाण काढून टाकण्यास मदत करते. यामुळे त्वचा स्वच्छ आणि चेहऱ्यावरील मुरूम जाण्यास देखील मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Olive oil is beneficial for the skin)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें