AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी ऑफिसला जायच्या धावपळीत पटकन बनवा पनीर भुर्जी सँडविच; जाणून घ्या रेसिपी

सकाळच्या सुमारास बहुतेक जणांना कामाला जाण्याची घाई असते. कामाला जायच्या घाईत हेल्दी नाश्ता करणे फायदेशीर असते. तुम्ही पनीर भुर्जी सैंडविच तयार करू शकता

सकाळी ऑफिसला जायच्या धावपळीत पटकन बनवा पनीर भुर्जी सँडविच; जाणून घ्या रेसिपी
| Updated on: Jul 04, 2026 | 3:43 PM
Share

सकाळी बहुतेक जणांना कामाला जाण्याची घाई असते. कामाला जायच्या घाईत नाश्ता टाळणे नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे सकाळच्या सुमारास नाश्ता करून कामाला जाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. हेल्दी आणि चविष्ट नाश्ता हवा असेल, तर तुम्ही पनीर भुर्जी सँडविच तयार करू शकता. तुम्ही अवघ्या 10 मिनिटांत हा नाश्ता तयार करू शकता. पनीर भुर्जी सँडविच करणे फार सोपे आहे. या पदार्थाची रेसिपी जाणून घ्या.

साहित्य

पनीर : 200 ग्रॅम ब्रेड : 4 ते 6 स्लाइस कांदा : 1 बारीक चिरलेला टोमॅटो : 1 बारीक कापलेला हिरवी मिरची : 1 बारीक चिरेलली कोंथिबीर : बारीक चिरलेली मसाले : 1/2 चमचे हळद, 1/2 चमचे लाल तिखट, 1/2 चमचे गरम मसाला, चवीनुसार मीठ लोणी : बेकिंग आणि स्वयंपाकासाठी हिरवी चटणी किवा टोमॅटो कॅचप

कसा तयार कराल?

स्टेप 1

सर्वात आधी तव्यावर चमच्याने तेल किंवा बटर गरम करा. त्यानंतर त्यावर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा टाकल्यानंतर तपकिरी रंग येईपर्यंत परतून घ्यावा. नंतर टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावा.

स्टेप 2

तव्यावर हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ घालावे. नंतर मंद आचेवर 3O सेकंदात मसाले परतून घ्यावे. आता मॅश केलेले पनीर चांगले मिसळून घ्यावे. पनीर मसाल्यासोबत 2 मिनिटे परतून घ्यावे. त्यानंतर वरतून बारीक कापलेली कोथिंबीर टाकून गॅस बंद करावा. तुमची पनीर भुर्जी तयार झाली आहे.

स्टेप 3

ब्रेडचे दोन स्लाइस घ्यावे. त्यानंतर लाल तिखट आवडत असेल, तर स्लाइसवर हिरवी चटणी लावावी. दुसर्‍या स्लाइसवर टोमॅटो कॅचप लावावा. आता ब्रेडवर तयार केलेली पनीर भुर्जी टाकावी. त्यावर आता दुसरा ब्रेड टाकावा.

स्टेप 4

तवा किंवा सँडविच मेकर हा गॅसवर गरम करावा. त्यानंतर त्यात थोडेसे बटर टाकावे. तुमच्याकडे तवा असल्यास सँडविचला तव्यावर ठेवून मंद किंवा मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत गरम करा. आता तुमचा गरमागरम कुरकरीत सँडविच तयार झालाय. तुम्ही  चहासोबत सँडविच खाऊ शकता. तुम्ही कॉफीसोबत देखील सँडविचचा आस्वाद घेऊ शकता.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा