Paneer Face Pack: एकदा नक्की ट्राय करा पनीर फेस मास्क; चेहरा इतका सुंदर आणि ग्लोविंग दिसेल की पाहणारे पाहतच राहतील

वनिता कांबळे

Updated on: Jun 29, 2022 | 7:17 PM

तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी पनीर फेस पॅक खुपच उपयुक्त ठरतो. तेलकट त्वचेमुळे अनेकदा पिंपल्सचा त्रास होतो. स्किन खूप डल वाटते. यामुळे ऑईली स्किन असणाऱ्यांसाठी पनीर फेस पॅक निश्चितच फायदेशीर ठरेल.

Paneer Face Pack: एकदा नक्की ट्राय करा पनीर फेस मास्क; चेहरा इतका सुंदर आणि ग्लोविंग दिसेल की पाहणारे पाहतच राहतील

पनीर हा सगळ्यांचा आवडता पदार्थ. पनीरच्या वेगवेगळ्या डिशेस चांगल्याच लोकप्रिय आहेत. केवळ जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठीच नाही तर सौंदर्य प्रसाधन म्हणून ही पनीरचा वापर केला जातो. त्यामुळे पनीर फेस मास्क(Paneer Face Pack) एकदा नक्की ट्राय करा. या फेस पॅकचा तुम्हाला बेस्ट रिझल्ट पहायला मिळेल. हा पॅक लावल्यानंतर तुमचा चेहरा इतका सुंदर आणि ग्लोविंग दिसेल( beautiful and glowing skin) की पाहणारे पाहतच राहतील.

बेस्ट होम रेमिडी

महिला वर्ग चेहरा स्वच्छ आणि चमकदार दिसावा यासाठी अनेक उपाय करत असता. यात ब्युटी पार्लरमध्ये जाऊन घेतल्या जाणाऱ्या ट्रीटमेंट आणि होम रेमिडीजचा देखील समावेश असतो. यासाठी पनीर फेस पॅक हा देखील एक बेस्ट ऑप्शन ठरु शकतो.

ऑईली स्किन असणाऱ्यांसाठी पनीर फेस पॅक फायदेशीर

तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी पनीर फेस पॅक खुपच उपयुक्त ठरतो. तेलकट त्वचेमुळे अनेकदा पिंपल्सचा त्रास होतो. स्किन खूप डल वाटते. यामुळे ऑईली स्किन असणाऱ्यांसाठी पनीर फेस पॅक निश्चितच फायदेशीर ठरेल.

पनीरमध्ये आहेत हाय प्रोटीन्स

पनीर हा एक दुग्धजन्य पदार्थ आहे. यात हाय प्रोटीन्स असतात. यामुळेत पनीर स्कीनवर नवीन पेशी बनवण्यास आणि जुन्या पेशी लवकर दुरुस्त करण्यास मदत करते. याशिवाय पनीरमध्ये लॅक्टिक नावाचे अॅसिड आढळते. त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास मदत करते.

असा बनवा पनीर फेस पॅक

पनीर फेस मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला तुमच्या किचनमध्ये सहज मिळेल. यासाठी तुम्हाला १ 1 टीस्पून बेसन, मॅश केलेले पनीर 1 टीस्पून 1/2 टीस्पून दही इतकचं साहित्य लागणार आहे.

सर्व साहित्य गोळा केल्यानंतर हे तयार करण्याची कृती देखील सोप्पी आहे. सर्वप्रथम एका भांड्यात 1 चमचे मॅश केलेले पनीर घ्या. यानंतर त्यात 1 टीस्पून बेसन आणि 1/2 टीस्पून दही घाला. हेसर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.

याची गुळगुळीत पेस्ट तयार करा. पनीर फेस मास्क तयार आहे. हा पॅक तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. यांनतर हा 20 मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. तुम्हाला त्वरीत तुमच्या चेहऱ्यावर याचा इफेट्क दिसून येईल.

‘हा’ चहा… वजन कमी करण्यापासून ते शरीरात ऊर्जा वाढविसाठी आहे फायदेशीर

चहा हे भारतातील सर्वात आवडत्या पेयांपैकी एक आहे. त्याचे सेवन कितपत फायदेशीर आहे किंवा त्यामुळे नुकसान होऊ शकते याबाबत अभ्यासात तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. साधारणपणे, शरीरातील उर्जेचा प्रसार आणि आळस दूर करण्यासाठी (overcome laziness) चहाचे सेवन केले जाते, परंतु तुम्हाला माहित आहे का की काही प्रकारचे चहा केवळ पिण्याच्याच नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही तुमच्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकतात. सी-बकथॉर्नच्या पानांपासून (leaves of C-buckthorn)तयार केलेला चहा देखील अतिशय फायदेशीर पेय म्हणून ओळखला जातो. सी-बकथॉर्न ही एक प्रकारची औषधी वनस्पती आहे. त्याची पाने, फुले आणि फळे अनेक प्रकारची औषधे तयार करण्यासाठी वापरली जातात. तज्ज्ञांच्या मते त्याच्या पानांपासून बनवलेला चहा खूप फायदेशीर आहे. सी-बकथॉर्नवर केलेल्या एका अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की अनेक प्रकारच्या दीर्घकालीन आरोग्य समस्यांमध्ये त्याचा तुम्हाला विशेष फायदा (Special advantage) होऊ शकतो.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI