AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाईजानला त्रास देऊ नकोस… सलमानचा बॉडीगार्ड शेराची महिलेला धमकी, बॉलिवूडमध्ये खळबळ; काय आहे प्रकरण?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने 2017 मधील एका प्रकरणात मदत मागितली आहे,

भाईजानला त्रास देऊ नकोस... सलमानचा बॉडीगार्ड शेराची महिलेला धमकी, बॉलिवूडमध्ये खळबळ; काय आहे प्रकरण?
salman khan sheraImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 04, 2026 | 2:08 PM
Share

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. तो कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरतो. सलमानसोबतचा त्याचा बॉडीगार्ड शेरा देखील सतत लाइमलाइटमध्ये असतो. शेरा उर्फ गुरमीत सिंग हा एका वेगळ्या प्रकरणामुळे चर्चेत आहे. त्याच्या विरोधात नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे चला जाणून घेऊया…

अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याच्याविरुद्ध नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. शेरावर एका महिलेने फोन करून धमकावल्याचा गंभीर आरोप केला आहे. ही घटना २०१७ वर्षातील आहे. ही महिला ‘बिग बॉस’ शोशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

२०१७ मध्ये ‘बिग बॉस’च्या घरातून सलमान खानने एका स्पर्धकाला आक्षेपार्ह वक्तव्यामुळे बाहेर काढले होते. या स्पर्धकाला पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी एक महिला मदत करणार होती. या महिलेच्या आरोपानुसार, तिने तक्रार करू नये म्हणून शेरने तिला फोन करून धमकावले. त्याने तिला सांगितले की, “सलमानला त्रास देऊ नकोस, तक्रार करू नकोस.” महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी शेराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. नंतर या प्रकरणाचे आरोपपत्र (चार्जशीट) देखील दाखल करण्यात आले.

शेराची याचिका

आता शेराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हा गुन्हा आणि त्याचे आरोपपत्र रद्द करण्याची मागणी केली आहे. याचिकेत शेराने आपल्याविरुद्धचे आरोप फेटाळले असून, न्यायालयाकडे गुन्हा रद्द करण्याची विनंती केली आहे. ही घटना जवळपास ८ वर्ष जुनी असली तरी, ती आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुंबई उच्च न्यायालय लवकरच या याचिकेवर सुनावणी घेणार असल्याचे समजते.

मुख्य मुद्दे:

-शेराने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली.

-महिलेला फोन करून धमकावल्याचा आरोप.

-घटना २०१७ ची, ‘बिग बॉस’ शोशी संबंधित.

Follow Us
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.
वांद्र्यातील अनधिकृत बांधकाम कारवाईवर काँग्रेस नेता संतापला, त्या...
वांद्र्यातील अनधिकृत बांधकाम कारवाईवर काँग्रेस नेता संतापला, त्या....
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी धडाकाच लावलाय, मदरशांबाबत घेतला मोठा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी धडाकाच लावलाय, मदरशांबाबत घेतला मोठा.
मोटेगावकराने फोडलेल्या पेपरचा उघडपणे घेतला सराव, त्यानंतर व्हिडिओ...
मोटेगावकराने फोडलेल्या पेपरचा उघडपणे घेतला सराव, त्यानंतर व्हिडिओ....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत धनंजय मुंडे...
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत धनंजय मुंडे....
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा....
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन.
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल.